महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग
महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग
महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतीकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५. या कायदयान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाचे प्रमुख राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त, श्री. स्वाधीन क्षत्रिय आहेत. ते आपल्या राज्याचे माजी मुख्य सचिव आहेत.
या कायद्यांतर्गत कोणत्या सेवा नागरिकांना प्राप्त करून घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे, ही माहिती आपण आर.टी.एस. महाराष्ट्र या मोबाईल अॅप वर किंवा आपले सरकार वेब पोर्टल वर पाहू शकता व सेवा प्राप्त करण्याकरिता ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता. सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास किंवा संयुक्तिक कारण नसताना सेवा नामंजूर करण्यात आली तर नागरिक प्रथम अपील, द्वितीय अपील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व तिसरे आणि शेवटचे अपील आयोगाकडे दाखल करू शकतात.
भेट द्या: https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय
स्थान : निर्मल इमारत, दुसरा मजला, नरिमन पॉईंट | शहर : मुंबई | पिन कोड : 400021
ईमेल : ccrts[at]maharashtra[dot]gov[dot]in