बंद
DM Palghar
श्री. गोविंद मारुती बोडके जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी

पालघर अँड्रॉइड अँप

QR

जिल्ह्याविषयी

सागरी-डोंगरी अन् नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ पासून नव्याने पालघर हा राज्यातील ३६वा जिल्हा अस्तित्वात आला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली. पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा आहे.कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पुर्वेकडे सहयाद्री पर्वत रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या मधे पसरला आहे. जिल्हयाच्या दक्षिणेस मुंबई, ठाणे तर उत्तरेस वलसाड(गुजरात) व दादरा आणि नगर हवेली आहे. पालघर जिल्हाची एकूण लोकसंख्या २९,९५,४२८ एवढी आहे. पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे.

पालघर जिल्हाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४६९६९९ हेक्टर असून त्यामध्ये एकूण १००७ गावे व ३८१८ पाडे आहेत. तसेच ४६७ ग्रामपंचायती आहेत.पालघर जिल्हातील साक्षरतेचे प्रमाण ६६.६५% आहे. त्यामधील पुरूषांचे प्रमाण ७२.२३% इतके आहे तसेच महिलांचे प्रमाण ५९.२८% इतके आहे.

जिल्हयाला ११२ कि.मी. चा समुद्र किनारा लाभलेला आहे. वसई, अर्नाळा, तारापूर, केळवा, शिरगाव, कालदुर्ग, कामनदुर्ग, गंभीरगड हे ऐतिहासिक किल्ले या जिल्हयात आहेत. जिवदानी मंदीर व महालक्ष्मी मंदीर हे या जिल्याचे आध्यात्मिक वैभव आहे.

पालघर जिल्हयात आदिवासी लोकसंख्या आहे. वारली चित्रकला व तारपा नृत्‍य ही या जिल्हयाची सांस्कृतिक ओळख आहे. डहाणू तालुक्यातील घोलवडचे चिकू प्रसिध्द आहेत.

छायाचित्र दालन

  • प्रदर्शित करण्यासाठी कोणतीही पोस्ट नाही