बंद

औद्योगिक माहिती

उद्योग-सातव्या पंचवार्षिक योजनेखाली दाखविलेल्या सर्व योजना आठव्या पंचवार्षिक योजनेत अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत.

या योजने अंतर्गत लहान व कुटीर उद्योग करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्याबाबत भर देण्यात आला आहे.

जिल्ह्यात १ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसीत केलेले क्षेत्र ,३ शासकीय सहकारी औद्योगिक वसाहती अस्तित्वात असून ५७५७ लघु उद्योग नोंदणीकृत, १८८३ अस्थायी लघु उद्योग नोंदणीकृत असून ४२७ मोठे/मध्यम उद्योग घटक अस्तित्वात आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेले औद्योगिक क्षेत्र.

ओद्योगिक वासाहित नाव एमआयडीसी , तारापूर तालुका व जिल्हा-पालघर शासनाच्या मदतीने उभारण्यात आलेल्या सहकारी ओद्योगिक वसाहती :

  1. दि पालघर तालुका ओद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित, ता.पालघर
  2. दि वसई तालुका ओद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित, ता.वसई
  3. प्रियदर्शिनी ओद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित, ता.वाडा
Viraj Industries

महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ व कोंकण विकास महामंडळाने स्थापन केलेल्या ओद्योगिक वसाहती एमएसएसआयडीसी वुडबेसड कॉम्पलेक्स, वाडा क्षेत्रफळ-२२ एकर ,प्लॉट संख्या -१९

विशाल प्रकल्प सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील एकूण १५ विशाल प्रकल्पांना महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली असून यापैकी ७ प्रकल्पांनी उत्पादन सुरु केले आहे. तालुकानिहाय प्रकल्पांची यादी जोडलेली आहे. वाडा तालुक्यात एकुण ८विशाल प्रकल्प प्रस्तावित आहेत.

पालघर जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता , जंगलपट्टी , बंदरपट्टी व पठारी प्रदेश असे ढोबळ मानाने भौगोलिक विभाग पडतात . या भौगोलिक परिस्थितीचा परिणाम तेथील लोकांचे राहणीमान व व्यवसाय यांचेवर झालेला दिसून येतो . जव्हार, मोखाडा व विक्रमगड या डोंगराळ जंगलपट्टी भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे .

या भागात प्रामुख्याने भात व नागली यांची शेती केली जाते . तसेच आलिकडच्या काळात हळद लागवडीचा प्रयोग देखिल यशस्वी झालेला आहे . याशिवाय जंगलातील लाकुडफाटा गोळा करणे व जंगलातील मध , लाख व औषधी वनस्पती इत्यादी गौण उत्पादाने गोळा करणे हा देखिल व्यवसायाचा एक भाग आहे .

बंदरपट्टी भागामध्ये मासामारी हा प्रमुख व्यवसाय आहे . तसेच त्यावर आधारित मासे सुकविणे , कोळंबी संवर्धन प्रकल्प इत्यादी व्यवसाय केले जातात . बंदरपट्टी भागामध्ये मासामारी हा प्रमुख व्यवसाय आहे . तसेच त्यावर आधारित मासे सुकविणे , कोळंबी संवर्धन प्रकल्प इत्यादी व्यवसाय केले जातात . पालघर तालुक्यातील सातपाटी , दातिवरे , मुरबे ,नवापुर , दांडी , आलेवाडी ,नांदगांव बंदर तसेच वसई तालुक्यातील नायगांव ,पाचु बंदर, किल्ला बंदर, अर्नाळा तसेच डहाणु तालुक्यामधील बोर्डी, चिंचणी व डहाणु या ठिकाणी मासेमारीसाठी प्रमुख बंदरे आहेत .

मासे टिकविण्यासाठी शीतगृहे तसेच तसेच आईस कारखाना या व्यवसायात देखिल रोजगार निर्मिती होते . पालघर तालुक्यातील सातपाटी येथून पापलेट व कोळंबी या माशांची निर्यात केली जाते .

जिल्हयातील सपाट पठारी प्रदेशामध्ये औद्योगिक पट्टे अस्तित्वात आहेत .यामध्ये मुख्यतः कापड उद्योग , रासायनिक कारखाने , अभियांत्रिकी उद्योग ,स्टील उद्योग इत्यादीचा समावेश आहे . बोईसर येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे औद्योगिक विभागात टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील , विराज स्टील , यासारख्या पोलाद निर्मिती करणारे कारखाने आहेत. तसेच डि-डेकॉर , सियाराम यासारख्या कापड निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत.

या उद्योगामुळे या परिसरात मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती व पूरक व्यवसाय निर्मिती झालेली आहे . तसेच येथून मोठया प्रमाणात निर्यात होऊन परकीय चलन मिळते . वाडा तालुक्याला हा ‘ड’ वर्गीय औद्योगिक दर्जा प्रपात झालेला आहे . वाडा तालुक्यामध्ये ओनिडा , कोकाकोला यासारखे कारखाने आहेत .

वसई तालुक्यातील वसई , विरार , नालासोपारा या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र विकसीत झालेले आहे .

तसेच डहाणु तालुक्यातील चिंचणी व पालघर तालुक्यातील तारापुर येथे घरोघरी पारंपारिक डायमेकींग हा प्रमुख व्यवसाय केला जातो .

पालघर जिल्हयातील मोठे प्रकल्पाची माहिती

अ. क्र. उद्योग घटकांचे नाव तालुका सद्यस्थिती
बॉम्बे रेयॉन फ्याशन लि. पालघर उत्पादन सुरु
रेस्पोन्सिव्ह इंडस्ट्रीज लि. पालघर उत्पादन सुरु
श्री वैष्णव मेटल वायर अन्ड रोप्स प्रा. लि. वाडा उत्पादन सुरु
श्री वैष्णव मेटल अन्ड पोवर लि. वाडा उत्पादन सुरु
मंधाना इंडस्ट्रीज लि. पालघर उत्पादन सुरु
जय भवानी इस्पात प्रा.लि. वाडा प्राथमिक सुरुवात
घासिराम स्टील इंडस्ट्रीज प्रा. लि. वाडा प्राथमिक सुरुवात
कलिस्मा स्टील प्रा.लि. वाडा बांधकाम सुरु
विराज प्रोफाईल लि. पालघर उत्पादन सुरु

पालघर जिल्ह्यातील मोठया प्रकल्पाबाबतची माहिती व सद्यस्थिती

जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाकडील आवेदन पत्र दाखल केलेल्या व त्यानुसार स्विकृती प्राप्त मोठया उद्योगांचा तालुकानिहाय तपशिल खालील प्रमाणे आहे.

अ. क्र. तालुका संख्या गुंतवणूक(लाखांत) रोजगार संख्या
पालघर २७६ २६५२६७ २२०१२
वसई ४५ २९१३० २१९७
तलासरी १९ ७२१९ ८०५
विक्रमगड
वाडा ८० ४००८७९ ९१९४
जव्हार
डहाणू १५९८ ७६९
मोखाडा

राज्य शासनाच्या सामुहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मंजुरी प्राप्त मोठे प्रकल्प

अ. क्र. तालुका प्रस्तावित प्रकल्प उत्पादन सुरु केलेले घटक
संख्या गुंतवणूक(कोटी) रोजगार संख्या संख्या गुंतवणूक(कोटी)
पालघर ४५१३. ४७ ११२०० ३४२१. ८५
वसई
तलासरी
विक्रमगड
वाडा २०८६. ९२ ४२८५ १०१. ७३
जव्हार
डहाणू
मोखाडा
एकूण १५ ६६००. ३९ १५४८५ ३५२३. ५८

मोठे प्रकल्प सद्यस्थिती

अ. क्र. तालुका एकूण मंजूर प्रकल्प उत्पादनात गेलेले रद्द प्रकल्प प्राथमिक टप्पे पूर्ण केलेले बांधकाम सुरु असलेले
पालघर
वाडा
एकूण १५

पालघर जिल्यातील सुक्ष्म लघु व मध्यम उद्योगांच्या नोंदणीची माहिती

आवेदन पत्र उद्योगांची संख्या यंत्रसामुग्रीची रक्कम (रु.लाखात ) रोजगार
प्रपत्र -१ १८४३ १६४१३८ ३६९१८
प्रपत्र -२ ५७२७ ३४३१४३ ११४८०७
एकूण ७५७० ५०७२८१ १५१७२५

को-ओपेरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट वसई व पालघरमधील नोंदणी घटकांची

अ. क्र. तालुका प्रपत्र -१ प्रपत्र -२
वसई ५६
पालघर ३७