बंद

इतिहास

पालघर जिल्हयातील पालघर वसई व जव्हार तालुक्यांना सोनेरी इतिहासाचा वारसा आहे .
वसई तालुक्यावर पूर्वी पोतुर्गीजांचे अधिराज्य होते. पेशवे काळामध्ये चिमाजी अप्पांनी पोतुर्गीजांचे साम्राज्यास सुरुंग लावत  मराठी झेंडा रोवला.
भारतीय स्वातंत्र्य लढयामध्ये ‘सन १९४२ चे चाले जाओ’ आंदोलनामध्ये पालघर हे महत्वाचे केंद्र होते.इंग्रज साम्राज्याशी लढा देण्यासाठी पालघर तालुक्यात १४ ऑगस्ट १९४२ रोजी उठाव झाला होता.या उठावामध्ये पालघर तालुक्यातील पाच हुतात्मा शहीद झाले होते.
सातपाटीचे काशिनाथ हरी पागधरे , नांदगावचे गोविंद गणेश ठाकूर ,पालघरचे रामचंद्र भीमाशंकर तिवारी ,मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी ,शिरगाव चे सुकुर गोविंद मोरे हे हुतात्मे स्वातंत्र्यासाठी इंग्रजाशी लढा देताना शहीद झाले.
या शहीदांचे स्मृती म्हणून पालघर शहरामध्ये हुतात्मा चौक उभारलेला आहे.
तसेच सन १९३०चा मिठाचा सत्याग्रह सुरु झाला तेव्हा पालघर तालुक्यातील वडराई ते सातपाटी पासून अनेक कार्यकर्ते या सत्याग्रहात सामिल झाले होते.
सातपाटी येथे परदेशी वस्तूंची होळी करण्यात आली होती.
जव्हार येथे राजे मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान होते . तेथील राजे मुकणे संस्थानाचा प्रसिद्ध राजवाडा आजही इतीहासाची साक्ष देत आहे .

सांस्कृतिक वारसा

जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वारली ,कातकरी ,मल्हार कोळी इत्यादी आदिवासी जमाती आहेत . आदिवासी सामाज्याने आपला सांस्कृतिक वारसा जपला असून त्यामधील वारली चित्रकला व तारपा नृत्य हि त्यांच्या समाजजीवनाची ओळख आहे .
वारली चित्रकारी आदिम काळापासून म्हणजे जेव्हा मनुष्य वास्तव्य करीत होता त्या काळापासून म्हणजे साधारपणे ११०० वर्षापासून जतन केलेली आहे .
या चित्रकलेमधे आदिवासी समाज्याच्या विविध चालीरीती तसेच दैनंदिन होणाऱ्या घडामोडी,आदिवासींच्या दैनंदिन जीवनात होणारे प्रसंग उदा . लग्न ,नृत्य विविध सण निसर्गातील घडामोडी अशा प्रकारचे प्रसंग उत्तम प्रकारे चित्ररूपाने दाखवले जातात .
हि चित्रे कुठल्याही प्रकारचा रासायीनिक रंग न वापरता निसर्गापासून मिळणाऱ्या वस्तू ,उदा ,माती ,तांदळाचे पीठ ,वनस्पतीजन्य रंग व बांबूच्या काड्यांचे ब्रुश वापरून काढली जातात .
हि कला आदिवासींच्या जीवनशैलीच्या विविध पैलुंवर प्रकाश टाकणारी चित्रकला असून या चित्रकलेला भारतात तसेच परदेशात खूप मागाणी आहे.

varli Painting