बंद

जिल्ह्याविषयी

collector Office Palghar

सागरी-डोंगरी अन् नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ पासून नव्याने पालघर हा राज्यातील ३६वा जिल्हा अस्तित्वात आला. तत्कालीन मुख्यमंत्री  आणि तत्कालीन महसूलमंत्री  यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली. पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा आहे.कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पुर्वेकडे असणार्या सहयाद्री पर्वत रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टी दरम्यान पसरला आहे. पालघर जिल्हाची एकूण लोकसंख्या २९,९०,११६ एवढी आहे. पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे़.
पालघर जिल्हाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४६९६९९ हेक्टर असून त्यामध्ये एकूण १००८ गावे व ३८१८ पाडे आहेत. तसेच ४७७ ग्रामपंचायती आहेत.पालघर जिल्हातील साक्षरतेचे प्रमाण ६६.६५% आहे. त्यामधील पुरूषांचे प्रमाण ७२.२३% इतके आहे तसेच महिलांचे प्रमाण ५९.२८% इतके आहे.

तालुकानिहाय शहरे

पालघर तालुक्यातील २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील शहरे आणि गावांमध्ये संख्या

अ.क्र. तालुका गावांची संख्या शहरांची संख्या
वसई १२५ ०५
पालघर २२२ ०२
डहाणू १८३ ०२
तलासरी ४६ ००
जव्हार १०९ ०१
मोखाडा ५९ ००
वाडा १७० ००
विक्रमगड ९४ ००
एकूण १००० १०

साक्षरता टक्केवारी

अ. क्र. तहसील साक्षरता प्रमाण
पुरुष % स्त्री % एकूण %
मोखाडा ५३.७० ३९.४०२ ४६.५४
तलासरी ५७.३३ ३७.५७७ ४७.३३
जव्हार ५४.४८ ४१.४३४ ४७.८८
4 डहाणू ५९.२१ ३३.३२४ ५१.१५
विक्रमगड ६१.०० ४६.२६८ ५३.६०
वाडा ७०.०७ ५५.७७९ ६३.१५
पालघर ७६.३४ ६४.०४९ ७०.४९
वसई ८०.02 ७३.४९७ ७६.९४
एकूण ७२.२३ ५९.२८१ ६६.६५

पालघर जिल्हा अनुसूचित क्षेत्र

अ.क्र. तहसील एकूण गावे अनुसूचित क्षेत्रातील गावे तहसील शेड्यूल्ड एरिया
पालघर २२२ १६४ आंशिक
वसई १२५ ५१ आंशिक
डहाणू १८३ १८३ संपूर्ण क्षेत्र
तलासरी ४६ ४६ संपूर्ण क्षेत्र
वाडा १७० १७० संपूर्ण क्षेत्र
विक्रमगड ९४ ९४ संपूर्ण क्षेत्र
जव्हार १०९ १०९ संपूर्ण क्षेत्र
मोखाडा ५९ ५९ संपूर्ण क्षेत्र
एकूण १००८ ८७६

जनगणना २०११ नुसार लोकसंख्या

अ. क्र. तहसील एकूण लोकसंख्या एस टी लोकसंख्या एस टी लोकसंख्या प्रमाण
पुरुष स्त्री एकूण पुरुष स्त्री एकूण
वसई ७०९७७१ ६३३६३१ १३४३४०२ ४८९२१ ४९३७७ ९८२९८ ७.३२
पालघर २८८५१४ २६१६५२ ५५०१६६ ८३४२४ ८४७२८ १६८१५२ ३०.५६
वाडा ९१९९० ८६३८० १७८३७० ५११६० ५०५४९ १०१७०९ ५७.०२
डहाणू १९९५७४ २०२५२१ ४०२०९५ १३५८४२ १४२०६२ २७७९०४ ६९.११
तलासरी ७६४१७ ७८४०१ १५४८१८ ६८६९९ ७१५७४ १४०२७३ ९०.६१
जव्हार ६९३३३ ७०८५४ १४०१८७ 63288 ६५१८२ १२८४६२ ९१.६४
विक्रमगड ६८४८९ ६९१३६ १३७६२५ ६२६४६ ६३७२२ १२६३६८ ९१.८२
मोखाडा ४१६९१ ४१७६२ ८३४५३ ३८२४६ ३८५९६ ७६८४२ ९२.०८
एकूण १५४५७७९ १४४४३३७ २९९०११६ ५५२२१८ ५६५७९० १११८००८ ३७.३९

आरोग्य संबंधित सुविधा

अ. क्र. तालुका ची संख्या
ग्रामीण रुग्णालये उपजिल्हा रुग्णालये पीएचसी उपकेंद्रे वैद्यकीय बचाव शिबीर प्राथमिक आरोग्य विभाग जेडपी डिस्पेन-सीरीज
पालघर १० ६२
वसई ३८
डहाणू ६५
तलासरी २९
वाडा ३८
विक्रमगड २३
जव्हार ३१
मोखाडा १९
एकूण १० ४६ ३०५ ३१ १८