जव्हार राजवाडा
यापैकी मुख्य म्हणजे जयविलास पॅलेस हा राजवाडा. हा राजवाडा खाजगी मालमत्ता असला तरी भव्यतेवरून त्याचे ऐतिहासिक महत्त्वलक्षात येते. राजवाडय़ात मुकणे घराण्यातील राजांची सुंदर तैलचित्रे आहेत. याशिवायजुने दुर्मिळ फर्निचर आणि अन्य वस्तूही येथे जतन करून ठेवण्यात आल्याआहेत. हा राजवाडा पालघर पासुन 42 किमी अंतरावर स्थित आहे.तसेच ‘पालघर जिल्हा महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाते. तसेच ह्याला घनदाट जंगले व श्रीमंत आनंददायी हवामान असलेल्या भेट आहे.पावसाळ्यात जव्हार हा भेट देण्याचा सर्वोत्तम काळ असतो तेव्हा धुक्यांनी आसपासची गावे आणि टेकड्या झाकून जातात . जव्हार हे वारली पेंटीगसाठीपण प्रसिध्द आहे.अतिशय शांत वातावरणातअरण्यांनी वेढलेले वैशिष्टपूर्ण हवामानाचे ठिकाण होय. आदिवासींचे दैवतअसलेले जयविलास आणि भूपतगडचे भग्नावशेष पाहण्यासारखे आहेत. दादर, कोपराधबधबा प्रेक्षणीय आहेत. त्याचप्रमाणे हनुमान पॉईंट, सनसेट पॉईंटपाहण्यासारखे आहेत.
 
                                                 
                             
            






