बंद

पुनर्वसन

जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथील पुनर्वसन विभागातील अधिकारी यांच्या अधिकारांचा तपशील

अ. क्र.

पदनाम

अधिकार- प्रशासकीय कोणत्या कायद्या/नियम /शासनिर्णय/ परिपत्रकानुसार
1. जिल्हाधिकारी /

अपर जिल्हाधिकारी

पर्यायी जमीनीचे / भूखंडाचे वाटप, आदेश महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999,

भूसंपादन अधिनियम 2013

2. उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) पालघर

प्रकल्पबाधीत व्यक्तींच्या नामनिर्देशित व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या कोटयामध्ये नोकरी मिळण्यासाठी प्रकल्पबाधित व्यक्तीला प्रमाणपत्र देणे/ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन/ नागरी सुविधा व अन्य फायदे देण्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार काम पार पाडणे.

नेमून देणेत आलेली भूसंपादन विषयक कामकाज पाहणे.

महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999,

भूसंपादन अधिनियम 2013

 

 

 

जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथील पुनर्वसन विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या कर्तव्याचा तपशील

. क्र. पदनाम         कर्तव्य कोणता कायदा/नियम/शासन निर्णय
1 जिल्हाधिकारी अ)    पालघर जिहयातील बाधीत व्यक्तीच्या पुनर्वसनासंबंधीच्या कामात समन्वय व त्यावर देखरेख ठेवणे.

ब)  प्रकल्पबाधीत व्यक्तीच्या पुनर्वसना संबंधात राज्य शासनाने आखलेल्या धोरणांच्या चौकटी नुसार प्रकल्पबाधीत व्यक्तीचे शीघ्र पुनवर्सन होत आहे याची सुनिश्चिती करण्यासाठी प्रकल्प अधिकारी व प्रकल्पाच्या कामावर नियुक्त केलेले दुय्यम अधिकारी यांना पुनर्वसनाचे काम करण्यास भाग पाडणे.

क)    प्रकल्पबाधीत व्यक्तीच्या नामनिर्देशीत व्यक्तीसाठी राखीव ठेवणेत आलेल्या कोटयामध्ये नोकरी मिळण्यासाठी प्रकल्पबाधीत व्यक्तींना नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला प्रमाणपत्र देणे.

ड)     राज्य शासन किंवा आयुक्त वेळावेळी लेखी आदेशाद्वारे त्यांच्याकडे सोपवतील असे इतर कामे पार पाडणे.

महाराष्ट्र प्रकल्प बांधीत व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम, 1999

भूसंपादन अधिनियम, 2013

2 उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) पुनर्वसन गावठाण निश्चित करणे. भूसंपादन प्रस्ताव तयार करणे. भूखंड वाटप करणे, पर्यायी लाभक्षेत्रातील शेतजमिनीचे वाटप करणे, प्रकल्प्रस्त दाखला देणे, नागरी सुविधांचे कामांचे अंदाजपत्रकीय प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करणे. पुनर्वसन कायद्याच्या तरतुदी लागू करणेसाठी कार्यवाही करणे.

नेमून देणेत आलेले भूसंपादन विषयक कामकाज पाहणे.

पुनर्वसन अधिनियम 1999 नुसार

 

 

 

 

 

 

 

भूसंपादन अधिनियम, 2013

3 सहायक महसूल अधिकारी/मंडळ अधिकारी/महसूल सहायक/ग्राम विकास अधिकारी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करणे, प्रकल्पाच्या अधिसुचना प्रसिद्ध करणे, नागरी सुविधा अंदाजपत्रके, जमिनीचे विक्री करणेकामी नाहरकत दाखले.

वरील सर्व कामांत उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांना मदत करणे.

पुनर्वसन अधिनियम 1999 नुसार

भूसंपादन अधिनियम, 2013

 

 

जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथील पुनर्वसन विभागातील कामाची कालमर्यादा

.क्र काम/कार्य आवश्यक कागदपत्रे दिवस / तास पुर्ण करण्यासाठी जबाबदार अधिकारी तक्रार निवारण अधिकारी
1 प्रकल्पग्रस्त दाखले 1) भुसंपादन कलम 4(1) ची व 12(2) ची नोटीस

2) भूसंपादन कलम 4(1) ची नोटीस ज्यांच्या नांवे आहे त्यांचे प्रतिज्ञापत्र

3) संपादित जमिनीचे 7/12

4) शिल्लक जमिनीचे 8 अ व 7/12

5) वयाबाबतचा पुरावा

30 दिवस उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अपर जिल्हाधिकारी
2 दाखला हस्तांतरण प्रमाणपत्र 1)  मूळ प्रकल्पग्रस्त दाखला

2) मूळ प्रकल्पग्रस्त व ज्यांच्या नांवे दाखला देण्यात आलेला आहे त्यांचे संमतीपत्र

30 दिवस उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अपर जिल्हाधिकारी
3 निर्बधित गावातील क्षेत्राच्या विक्रीसाठी नाहरकत प्रमाणपत्र 1) विक्री करावयाच्या जमिनीचे 7/12 व फेरफार उताऱ्याच्या मुळ अद्यावत प्रती.

2) जर मुखत्यार पत्र असेल तर ते दुय्यम निबंधक (रजिस्टर) यांचेसमोर (नोंदणीकृत) केलेले.

3) गाव नमुना नं. 8 अ (खाते उतारा) खरेदीदार व विक्रीदार यांचा असणे आवश्यक आहे.

4) जमिन विक्रीबाबत प्रतिज्ञालेख करुन सदर प्रतिज्ञालेखामध्ये सार्वजमिनक कामासाठी शासनाने मागणी केल्यास 8 अ वर असलेल्या माझ्या मिळकतीपैकी (लाभ क्षेत्रात येणारे सर्व्हे / गट नं. नमुद करावेत) जमिन शासनास पर्यायी शेत जमिन  म्हणून देण्यास तयार आहे. तसेच सदरच्या जमिनीची विक्री केल्यामुळे (विक्रीदार) भूमिहीन होत नाही. अशा आशयाचे प्रतिज्ञालेख करुन अर्जासोबत जोडावा.

5) आपण शासनास देवू केलेली जमिन ही लागवडी योग्य आहे किंवा कसे ? याबाबत कृषी अधिकारी/तलाठी यांचा दाखला असणे आवश्यक आहे.

6) पाटबंधारे खात्याचा विक्रीदार यांच्या 8 अ वरील सर्व सर्व्हे गट नं. निहाय प्रकल्पाच्या लाभ/बुडीत क्षेत्रात येते अगर कसे? याबाबतचा दाखला जोडावा.

7) ही जमिन विकत घेतल्यानंतर खरेदीदार यांचे नांवे एकूण —- एवढी जमिन होणार आहे व ते क्षेत्र सिलींग कायद्याचा भंग करणारे नसून शासनाने कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पास जमिनीची मागणी केल्यास ते देण्यास (खरेदीदार) तयार असलेबाबत अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र असणे आवश्यक आहे.

8) जी जमिन शासनास पर्यायी शेत जमिन म्हणून देणार आहात त्याचा 7/12 व हस्तस्केच नकाशा सोबत जोडावा.

3 महिने अपर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी

पुनवर्सन कामाशी संबंधित नियम / अधिनियम

. क्र. सुचना पत्रानुसार दिलेले विषय शासन निर्णय क्रमांक दिनांक
1 2 3
1 प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची दुय्यम प्रत देणेबाबत महसुल व वन विभाग शासन निर्णय क्र. आरपील-2004/प्र.क्र.101/र-1, दि. 4 जुन, 2004
2 प्रकल्पग्रस्त दाखला हस्तांतरणाबाबत. महसुल व वन विभाग शासन निर्णय क्र. आरपीए-2016/प्र.क्र.92/र-1, दि. 02 मे, 2016
3 आधी पुनवर्सन मग धरण या तत्वानुसार अवलंबविण्याच्या पुनर्वसनाच्या कार्यपध्दती बाबत. महसुल व वन विभाग शासन निर्णय क्र. एस, 30/ प्र.क्र. 35/र-1, दि. 14 सप्टेंबर, 2004
4 पाटबंधारे प्रकल्पाच्या साडंवा व पृच्छ कालवा यामध्ये ज्यांच्या जमिनी घेतल्या आहेत अशा मालकांना प्रकल्पग्रस्त समजण्याबाबत. महसुल व वन विभाग निर्णय क्र. संकीर्ण /2003/ 657/प्र.क्र.350/र-1, दि. 30 ऑगस्ट, 2004
5 प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप करणे शा.प.क्र.आरपीए/1090/सीआर/74(2)र-1, दि.08/06/1990
6 पर्यायी शेत जमिन वाटप करणे शा.प.क्र.आरपीए/1085/825/र-1, दि.12/04/1985
7 पुनर्वसन गावठाणात नागरी सुविधा पुरविणे. शा.ठ.क्र.आरपीए/1078/सीआर/8/र-1, दि.03/12/1985
8 प्रकल्पग्रस्त दाखले देणे शासन निर्णय क्रमांक : एईएम-1080/35/16-अ, दिनांक 21/01/1980.

 

शासन निर्णय क्रमांक : आरपीए-609/प्र.क्र. 200/र-1, दि. 03/05/2010

शासन निर्णय क्र. आरपीए-2016/प्र.क्र.92/र-1, दि.02 मे, 2016

9 राज्यातील पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिन वाटप करणेबाबत मार्गदर्शक सुचना शासन निर्णय क्रमांक : आरपीए-2021/प्र.क्र. 136/र-1, दि.14/10/2021
10 राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पात्र असलेल्या बाधित प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या पर्यायी जमिनीच्या कब्जाहक्काच्या रक्कमेची परिगणना करणेबाबत. शासन निर्णय क्रमांक : आरपीए-2021/प्र.क्र. 121/र-1, दि.14/10/2021
11 राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पात्र प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिन वाटप करण्यासंदर्भात प्राधान्यक्रम/ कार्यपद्धती निश्चित करणेबाबत. शासन निर्णय क्रमांक : आरपीए-2022/प्र.क्र. 82/र-1, दि.14/06/2022

पुनर्वसन कामाशी संबंधीत परिपत्रके

. क्र. सुचना पत्रानुसार दिलेले विषय शासन निर्णय क्रमांक दिनांक
1 2 3
1 कालव्यासाठी जमिन संपादन केली म्हणुन प्रकल्पग्रस्त दाखला मिळणे संबंधी क्र.आर.पी.ए./3582/2891/सी.आर

दि.28 ऑगस्ट, 1984

2 प्रकल्पग्रस्त म्हणुन दिलेला दाखला दुसऱ्या मुलांच्या नावे करण्याबाबत. क्र.कोयना/1091/प्र.क्र.338/र-4

दि.19 मे, 1994

3 प्रकल्पग्रस्त अथवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती यांना शासकीय सेवेतील गट क आणि गट ड मधील पदांवर नियुक्ती देण्याबाबत अनुसरावयाची  कार्यपध्दती सामान्य प्रशासन विभाग मंत्रायल  यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक प्रकल्प 1000/प्र.क्र.27/2000/16अ,

दि.13 सप्टेंबर 2000

4 प्रकल्पग्रस्त अथवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती यांना शासकीय सेवेतील गट क आणि गट ड मधील पदांवर नियुक्ती देण्याबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती सामान्य प्रशासन विभाग मंत्रायल  यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक प्रकल्प 1000/109/प्र.क्र.154/2001/16अ,

दि.23 सप्टेंबर 2000

5 महाराष्ट्र प्रकल्पबाधीत व्यक्तीने पुनर्वसन अधिनियम 1999 कलम 13 (3) अंतर्गत अधिसूचना प्रसिध्द  करणेबाबत महसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक आरपीए-2004/प्र.क्र.121/र-1,

दि.02 जुन  2004

6 प्रकल्पग्रस्ताकरीता विशेष अनुदान वाटप करण्याबाबत. महसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक आरपीए-2004/प्र.क्र.161/र-1,

दि.23 ऑगस्ट, 2004

7 पाटबंधारे प्रकल्पांचा सांडवा व पृच्छ कालवा यामध्ये ज्यांच्या जमिनी घेतल्या आहेत. अशा जमिन मालकांना प्रकल्पग्रस्त समजण्याबाबत. शासन निर्णय क्रमांक 2003/657/प्र.क्र. 350/र-1, दि.23 ऑगस्ट, 2004
8 प्रकल्पग्रस्त म्हणुन दाखला देण्याबाबत. शासन निर्णय क्र. आर.पी.एल. 2007/ प्र.क्र.293/र-1, दि.27 मार्च, 2008
9 भुकंपग्रस्त व्यक्तींना प्रकल्पग्रस्त व्यक्तीप्रमाणे शासकीय सेवेतील गट “Ûú” व गट “›ü” मधील पदांवर नियुक्ती देणे बाबत. शासन निर्णय क्रमांक भूकंप -1008/प्र.क्र.145/2008/16-अ मंत्रालय, मुंबई 400032 दि.27 ऑक्टोबर 2008
10 प्रकल्पग्रस्तांना असलेल्या 5% समांतर आरक्षणांतर्गत भुकंपग्रस्तांसाठी स्वतंत्रपणे 2% समांतर आरक्षण लागु करणेबाबत. शासन निर्णय क्रमांक भूकंप – 1009/प्र.क्र. 207/2009/16 अ मंत्रालय, मुंबई 400032, दि.27 ऑगस्ट 2009
11 प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबुन असणाऱ्या व्यक्तीना तसेच भूकंपग्रस्तांना शासकीय सेवेतील गट “Ûú” व गट “›ü” मधील पदांवर नियुक्ती देणे बाबत. शासन निर्णय क्रमांक न्यायप्र-1009/प्र.क्र. 202/09/16-अ मंत्रालय, मुंबई 400032 दि.27 ऑक्टोंबर, 2009

प्रकल्पांची अनुक्रमणीका

1.देहरजी मध्यम प्रकल्प, ता.विक्रमगड, जि.पालघर. 2

2.प्रकल्पाचे नांव :- लेंडी ल.पा.योजना, ता.जव्हार, जि.पालघर. 3

3.प्रकल्पाचे नांव :- दापचरी दुग्ध प्रकल्प, ता. डहाणू.. 5

4.प्रकल्पाचे नांव :- तारापूर प्रकल्प टप्पा क्र. 1 व 2, ता.पालघर. 6

5.प्रकल्पाचे नांव :- देवखोप लघु पाटबंधारे प्रकल्प, ता.पालघर. 7

6.प्रकल्पाचे नांव :- केळवा माहिम लघू पाटबंधारे प्रकल्प… 8

7.प्रकल्पाचे नांव :- हत्तीपाडा लघु पाटबंधारे प्रकल्प, ता.वसई. 9

8.प्रकल्पाचे नांव :- कोयना प्रकल्प, जि. सातारा.. 10

9.प्रकल्पाचे नांव :- वांद्री लघु पाटबंधारे प्रकल्प, ता.पालघर. 13

10.प्रकल्पाचे नांव :- तारापूर प्रकल्प टप्पा क्र. 3 व 4, ता.पालघर. 14

11.प्रकल्पाचे नांव :- वाघ नदी लघु पाटबंधारे प्रकल्प, ता.पालघर. 15

12.प्रकल्पाचे नांव :- सुर्या प्रकल्प, ता.डहाणू.. 16

13.प्रकल्पाचे नांव :- 4 मुंबई मध्य वैतरणा पाणी पुरवठा प्रकल्प, ता.मोखाडा… 17

14.प्रकल्पाचे नांव :- डोमहिरा लघु पाटबंधारे योजना, ता.जव्हार, जि.पालघर. 18

15.प्रकल्पाचे नांव :- उपराळे लघु पाटबंधारे प्रकल्प, ता.विक्रमगड.. 19

16.प्रकल्पाचे नांव :- कैनाड ग्रामिण पाणी पुरवठा प्रकल्प, ता.डहाणू.. 20

1.देहरजी मध्यम प्रकल्प, ता.विक्रमगड, जि.पालघर

1) प्रथम/अद्यावत प्रशासकीय मान्यता 1443.72 कोटी
2) प्रकल्प चालू झाल्याचा दिनांक 12/12/2018
3) बाधित गावांची नावे मौजे साखरे, खेडेद
4) बाधीत क्षेत्र 683.31 हे.आर (पैकी वन जमिन 445.29)
5) प्रकल्पग्रस्तांची संख्या प्रकल्पग्रस्त कुटूंबाची संख्या 262
6) नवीन वसाहतीच्या गावठाणांची नावे मौजे खरीवली, त.कोहोज, ता.वाडा
7) भूखंड वाटपाची सद्य:स्थिती
8) पर्यायी जमिन वाटपाची सद्य:स्थिती लागू नाही
9) उदर निर्वाह भत्त्ता सद्य:स्थिती
10) घर बांधणी अनुदान सद्य:स्थिती
11) स्वेच्छा पुनर्वसन अनुदान सद्य:स्थिती लागू नाही
12) अधिसूचना भूसंपादन (खाजगी जमीन)-कलम 11(1) ची अधिसूचना दि.24/12/2022 रोजी प्रसिध्द.

मौजे साखरे व खुडेद येथील गावठाण क्षेत्रावरील तसेच इतर बांधकामाखालील संपादित करावयाच्या क्षेत्राची कलम 11(1) ची अधिसूचना दि.12/07/2023 रोजी प्रसिध्द.

कलम 19(1) अधिसूचना दिनांक 31/07/2024 रोजी प्रसिध्द करणेत आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये अनुसूची – तीन व चार नुसार पुनर्वसन अधिसूचना प्रसिध्द केली आहे.

13) 18 नागरी सुविधांपैकी पूर्ण/अपूर्ण अद्याप कामास सुरुवात नाही.
14) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची सद्य:स्थिती भूसंपादन अधिनियम 2013 कलम 45 नुसार प्रकल्प स्तरावरील पुनर्वसन पुनर्वसाहत समितीच्या दिनांक 25/08/2023 रोजीच्या बैठकीमध्ये सर्वेक्षण अहवालानुसार बाधित गावातील लोकांचे पुनर्वसन खरीवली, ता.वाडा या ठिकाणी करणेकामी समितीवरील उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने मान्यता दिली आहे.

प्रकल्पाअंतर्गत बाधितांचे पुनर्वसनासाठी मौजे खरीवली, त.कोहोज, ता.वाडा, जि.पालघर येथे पुनर्वसन करणेकरीता 29.86.80 हे.आर जमिनीची संपादन प्रक्रिया उपविभागीय अधिकारी, वाडा यांचेमार्फत पूर्ण करण्यात आलेली आहे.

 

15) नागरी सुविधा हस्तांतरण सद्य:स्थिती अद्याप कामास सुरुवात नाही, पुनर्वसनाकरीताची संपूर्ण जागा हस्तांतरण झाले नंतर नागरी सुविधांची कामे हाती घेण्यात येतील.

 

 

 

2.प्रकल्पाचे नांव :- लेंडी ल.पा.योजना, ता.जव्हार, जि.पालघर

1) प्रथम/अद्यावत प्रशासकीय मान्यता शासन निर्णय दिनांक 01/09/2022 अन्वये व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त र.रु. 187.04 कोटी
2) प्रकल्प चालू झाल्याचा दिनांक जानेवारी  2008
3) बाधित गावांची नावे भोतडपाडा, ता. जव्हार
4) बाधीत क्षेत्र 172.06 हेक्टर
5) प्रकल्पग्रस्तांची संख्या 242
6) नवीन वसाहतीच्या गावठाणांची नावे भरसटमेट, ता.जव्हार
7) भूखंड वाटपाची सद्य:स्थिती भूखंड वाटपाची कार्यवाही सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहे.

 

8) पर्यायी जमिन वाटपाची सद्य:स्थिती धरण व बुडीत क्षेत्रासाठी 125.59.35 हे.आर क्षेत्र व कालव्यासाठी 25.71.1 हे.आर क्षेत्र भूसंपादन अधिनियम 2013 अन्वये संपादीत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जमिनीच्या बदल्यात जमिन अशी मागणी अद्याप पर्यत कोणत्याही खातेदारांनी केलेली नाही.
9) उदर निर्वाह भत्त्ता सद्य:स्थिती कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांचेकडून पुनर्वसन अनुदान निधी उपलब्ध झालेनंतर बाधित कुटूबांना देय पुनर्वसन अनुदानात असलेली उदर निर्वाह भत्ता देणेबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल.
10) घर बांधणी अनुदान सद्य:स्थिती कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांचेकडून पुनर्वसन अनुदान निधी उपलब्ध झालेनंतर बाधित कुटूबांना घर बांधणी अनुदान देणेबाबतची  पुढील कार्यवाही करण्यात येईल.
11) स्वेच्छा पुनर्वसन अनुदान सद्य:स्थिती निरंक
12) अधिसूचना कलम 11 (1) दि. 02 ऑगस्ट 2023

कलम 19 (1) दि. 16 जुलै  2024

 

13) 18 नागरी सुविधांपैकी पूर्ण/अपूर्ण नागरी सुविधांचे अंदाजपत्रकांना मा.जिल्हाधिकारी, पालघर काया्रलयाकडून दि.11/03/2024 रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, सद्यस्थितीत निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.
14) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची सद्य:स्थिती पुनर्वसन आराखडयास मा.विभागीय आयुक्त, कोंकण विभाग यांचे कार्यालयाकडून दिनांक 14/02/2024 च्या ज्ञापनाव्दारे मान्यता मिळाली आहे. भोतडपाडा गावातील 63 बाधित कुटूंबांना भुमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम 2013 या मधील तरतुदीनुसार देय पुनर्वसन अनुदान बाबतचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता, पाटबंधारे, बांधकाम विभाग यांचेमार्फत मा.सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार विभाग, जव्हार यांचेकडे सादर करणेत आलेला आहे.

कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांचेकडून पुनर्वसन अनुदान निधी उपलब्ध झालेनंतर बाधित कुटूंबांना पुनर्वसन अनुदान देणेबाबतची कार्यवाही करणेत येईल. तसेच भूखंड वाटपाची कार्यवाही सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहे.

15) नागरी सुविधा हस्तांतरण सद्य:स्थिती नागरी सुविधांची कामाची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

नागरी सुविधांची कामे पूर्ण झाल्यानंतर हस्तांतरणाची पुढील कार्यवाही करण्यात येईल.

3.प्रकल्पाचे नांव :- दापचरी दुग्ध प्रकल्प, ता. डहाणू

1) प्रथम/अद्यावत प्रशासकीय मान्यता 782 लक्ष (प्रथम प्रशासकी मान्यता दि.01/08/1960)
2) प्रकल्प चालू झाल्याचा दिनांक दि. 11/05/1960
3) बाधित गावांची नावे मौजे कोसबाड, बोरांडे, उपलाट, वडवली, मोडगांव, वंकास 1 व वंकास 2
4) बाधीत क्षेत्र 2183 हेक्टर
5) प्रकल्पग्रस्तांची संख्या 1338
6) नवीन वसाहतीच्या गावठाणांची नावे दापचरी, वंकास, मोडगांव, उपलाट, वडवली,बोरांडे, कोसबाड
7) भूखंड वाटपाची सद्य:स्थिती एकूण 1338 बाधित कुटूंबापैकी 633 कुटूंबांचे भूखंड वाटप करुन पुनर्वसन करण्यात आलेले आहे. उर्वरित 705 कुटूंबांनी स्वेच्छा पुनर्वसन केले आहे.
8) पर्यायी जमिन वाटपाची सद्य:स्थिती दापचरी दुग्ध प्रकल्प हा पाटबंधारे प्रकल्प नसल्याने बाधित खातेदारांना पर्यायी जमिन देय नाही.  तथापि खास बाब म्हणून शासन ज्ञापन कृषि व सहकार विभाग क्र. डी पी अे 1079/21514/7 अेडीफ, दि. 1/01/1980 अन्वये 171 खातेदारांना गोरखपाडा येथील ब्लॉक नं. 91 अ, 25 ग, व ब्लॉक नंबर 54 अ, 27 ग मधील 146.12 एकर क्षेत्र प्रकल्पग्रस्तांना कब्जे हक्कांने देण्यासाठी महसुल व वन विभागाकडे वर्ग करण्याबाबत दुग्ध विकास आयुक्तांना कळविले त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी ठाणे यांनी सदर जमिनीचे 471 प्रकल्पग्रस्तांना 479.12 हेक्टर दि. 31/01/1980 रोजी वाटप केले.
9) उदर निर्वाह भत्त्ता सद्य:स्थिती
10) घर बांधणी अनुदान सद्य:स्थिती
11) स्वेच्छा पुनर्वसन अनुदान सद्य:स्थिती
12) अधिसूचना पाटबंधारे प्रकल्प नसल्याने लागू होत नाहीत.
13) 18 नागरी सुविधांपैकी पूर्ण/अपूर्ण 1. नळ पाणी पुरवठा योजना, 2.विंधण विहीर, 3.विज पुरवठा, 4.जोड रस्ते व अंतर्गत रस्ते, 5.शाळा, 6.मैदाने, 7.समाज मंदीरे, चावडी, 8.दहन/दफन भूमि, 9.शौचकूप, 10.खडवाडी गुरांचा तळ, उघडी गटारे अशा नागरी सुविधा देण्यात आल्या आहेत.
14) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची सद्य:स्थिती सद्य:स्थितीत प्रकल्प पूर्ण आहे.
15) नागरी सुविधा हस्तांतरण सद्य:स्थिती नागरी सुविधा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली आहेत.

 4.प्रकल्पाचे नांव :- तारापूर प्रकल्प टप्पा क्र. 1 व 2, ता.पालघर

1) प्रथम/अद्यावत प्रशासकीय मान्यता 2589 लक्ष (प्रथम प्रशासकी मान्यता सन 1962)
2) प्रकल्प चालू झाल्याचा दिनांक सन 1962
3) बाधित गावांची नावे मौजे अक्करपट्टी व घिवली, ता.पालघर

मौजे साखरे बंधार, ता.डहाणू

4) बाधीत क्षेत्र 616.12.0 हे.आर
5) प्रकल्पग्रस्तांची संख्या 273
6) नवीन वसाहतीच्या गावठाणांची नावे मौजे देलवाडी (पाचघर), अक्करपट्टी  ता.पालघर
7) भूखंड वाटपाची सद्य:स्थिती एकूण 273 भूखंड पाडण्यात आलेले असून भूखंड मागणी केलेले व भूखंड दिलेल्या कुटूंबांची संख्या 196

शिल्लक असलेले भूखंड 77

8) पर्यायी जमिन वाटपाची सद्य:स्थिती एकूण 175 बाधित कुटूंबांना एकूण 454.14.0 हे.आर क्षेत्र वाटप करणेत आले आहे.
9) उदर निर्वाह भत्त्ता सद्य:स्थिती
10) घर बांधणी अनुदान सद्य:स्थिती
11) स्वेच्छा पुनर्वसन अनुदान सद्य:स्थिती
12) अधिसूचना प्रकल्प अधिसूचित नाही.
13) 18 नागरी सुविधांपैकी पूर्ण/अपूर्ण प्रकल्प अधिसूचित नाही. सुविधा प्रकल्पयंत्रणेने दिलेल्या आहेत.
14) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची सद्य:स्थिती सद्य:स्थितीत प्रकल्प पूर्ण आहे.
15) नागरी सुविधा हस्तांतरण सद्य:स्थिती नागरी सुविधा प्रकल्पयंत्रणेने दिलेल्या आहेत.

 5.प्रकल्पाचे नांव :- देवखोप लघु पाटबंधारे प्रकल्प, ता.पालघर

1) प्रथम/अद्यावत प्रशासकीय मान्यता 24.45 लक्ष (प्रथम प्रशासकी मान्यता दि.28/05/1974)
2) प्रकल्प चालू झाल्याचा दिनांक मे 1976
3) बाधित गावांची नावे एकूण 2 गावे बाधित होतात.
4) बाधीत क्षेत्र 92.93.0 हे.आर
5) प्रकल्पग्रस्तांची संख्या एकूण 47 कुटूंबे बाधित झालेली आहेत.
6) नवीन वसाहतीच्या गावठाणांची नावे शेलवली, ता.पालघर
7) भूखंड वाटपाची सद्य:स्थिती एकूण 18 भूखंड पाडणेत आले असून पात्र प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप करणेत आले आहे.
8) पर्यायी जमिन वाटपाची सद्य:स्थिती प्रकल्पाचे लाभ क्षेत्र 200.00 हेक्टर पेक्षा कमी असल्याने पर्यायी जमीन मिळण्यास पात्र नाहीत.
9) उदर निर्वाह भत्त्ता सद्य:स्थिती
10) घर बांधणी अनुदान सद्य:स्थिती
11) स्वेच्छा पुनर्वसन अनुदान सद्य:स्थिती
12) अधिसूचना प्रकल्प अधिसूचित नाही.
13) 18 नागरी सुविधांपैकी पूर्ण/अपूर्ण एकूण 7 नागरी सुविधा देण्यात आल्या आहेत. उर्वरित सुविधांसाठी जागा उपलब्ध नाही व मागणी ही नाही.
14) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची सद्य:स्थिती सद्य:स्थितीत प्रकल्प पूर्ण आहे.
15) नागरी सुविधा हस्तांतरण सद्य:स्थिती नागरी सुविधा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली आहेत.

6.प्रकल्पाचे नांव :- केळवा माहिम लघू पाटबंधारे प्रकल्प

1) प्रथम/अद्यावत प्रशासकीय मान्यता 24.14 लक्ष (प्रथम प्रशासकी मान्यता दि.24/08/1972)
2) प्रकल्प चालू झाल्याचा दिनांक डिसेंबर 1972
3) बाधित गावांची नावे मौजे केळवा माहीम, ता.पालघर
4) बाधीत क्षेत्र 14.00.0 हे.आर
5) प्रकल्पग्रस्तांची संख्या एकूण 37 कुटूंबे बाधित झालेली आहेत.
6) नवीन वसाहतीच्या गावठाणांची नावे मौजे झांझरोळी, ता.पालघर
7) भूखंड वाटपाची सद्य:स्थिती एकूण 14 भूखंड पाडून पात्र प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेले आहेत.
8) पर्यायी जमिन वाटपाची सद्य:स्थिती प्रकल्पाचे लाभ क्षेत्र 200.00 हेक्टर पेक्षा कमी असल्याने पर्यायी जमीन मिळण्यास पात्र नाहीत.
9) उदर निर्वाह भत्त्ता सद्य:स्थिती
10) घर बांधणी अनुदान सद्य:स्थिती
11) स्वेच्छा पुनर्वसन अनुदान सद्य:स्थिती
12) अधिसूचना प्रकल्प अधिसूचित नाही.
13) 18 नागरी सुविधांपैकी पूर्ण/अपूर्ण एकूण 7 नागरी सुविधा देण्यात आल्या आहेत. उर्वरित सुविधांसाठी जागा उपलब्ध नाही व मागणी ही नाही.
14) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची सद्य:स्थिती सद्य:स्थितीत प्रकल्प पूर्ण आहे.
15) नागरी सुविधा हस्तांतरण सद्य:स्थिती नागरी सुविधा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली आहेत.

7.प्रकल्पाचे नांव :- हत्तीपाडा लघु पाटबंधारे प्रकल्प, ता.वसई

1) प्रथम/अद्यावत प्रशासकीय मान्यता 58.75 लक्ष (प्रथम प्रशासकी मान्यता दि.27/03/1973)
2) प्रकल्प चालू झाल्याचा दिनांक फेब्रुवारी 1977
3) बाधित गावांची नावे मौजे भाताने (हत्तीपाडा)
4) बाधीत क्षेत्र 145.00 हेक्टर
5) प्रकल्पग्रस्तांची संख्या एकूण 14 कुटूंबे बाधित झालेली आहेत.
6) नवीन वसाहतीच्या गावठाणांची नावे मौजे भिनार, ता.वसई
7) भूखंड वाटपाची सद्य:स्थिती एकूण 14 भूखंड पाडून पात्र प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेले आहेत.
8) पर्यायी जमिन वाटपाची सद्य:स्थिती प्रकल्पाचे लाभ क्षेत्र 200.00 हेक्टर पेक्षा कमी असल्याने पर्यायी जमीन मिळण्यास पात्र नाहीत.
9) उदर निर्वाह भत्त्ता सद्य:स्थिती
10) घर बांधणी अनुदान सद्य:स्थिती
11) स्वेच्छा पुनर्वसन अनुदान सद्य:स्थिती
12) अधिसूचना प्रकल्प अधिसूचित नाही.
13) 18 नागरी सुविधांपैकी पूर्ण/अपूर्ण एकूण 7 नागरी सुविधा देण्यात आल्या आहेत.
14) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची सद्य:स्थिती प्रकल्प सद्यस्थितीत पूर्ण
15) नागरी सुविधा हस्तांतरण सद्य:स्थिती प्रकल्पग्रस्त गावठाणात राहत नाहीत.

8.प्रकल्पाचे नांव :- कोयना प्रकल्प, जि. सातारा

1) अद्यावत प्रशासकीय मान्यता मूळ प्रकल्प सातारा जिल्हयातील असल्याने माहिती उपलब्ध नाही.
2) प्रकल्प चालू झाल्याचा दिनांक सन 1960
3) बाधित गावांची नावे कोयना मूळ प्रकल्प सातारा जिल्हयातील आहे.
4) बाधीत क्षेत्र कोयना मूळ प्रकल्प सातारा जिल्हयातील आहे.
5) प्रकल्पग्रस्तांची संख्या कोयना मूळ प्रकल्प सातारा जिल्हयातील आहे.
6) नवीन वसाहतीच्या गावठाणांची नावे पालघर जिल्हयात वाडा तालुक्यात 03 अधिकृत व 05 स्वेच्छा पुनर्वसन वसाहती आहेत.

तालुका व जिल्हा अधिकृत वसाहती स्वेच्छा वसाहती
ता. वाडा, जि.पालघर 1)        कोळकेवाडी (उसर)

2)     उचाट

3)       कोळकेवाडी (गातेस)

1)        वैतरणा नगर

2)       कुसवडे (तूसे)

3)       कुसवडे (कूयुल)

4)     निहिंबे

5)     चेंदवली

7) भूखंड वाटपाची सद्य:स्थिती एकूण 122 भूखंड वाटप करणेत आले आहेत.
8) पर्यायी जमिन वाटपाची सद्य:स्थिती एकूण 106 प्रकल्पग्रस्तांना 191.02.9 हे.आर जमिन वाटप करणेत आली आहे.
9) उदर निर्वाह भत्त्ता सद्य:स्थिती
10) घर बांधणी अनुदान सद्य:स्थिती
11) स्वेच्छा पुनर्वसन अनुदान सद्य:स्थिती
12) अधिसूचना प्रकल्प अधिसूचित नाही.
13) 18 नागरी सुविधांपैकी पूर्ण/अपूर्ण सदर प्रकल्पांतर्गत एकूण 18 नागरी सुविधा पुरविणेत आलेल्या असून सदरच्या नागरी सुविधा जिल्हा परिषदेकडे वर्ग करणेत आलेल्या आहेत.

तसेच मा.अपर मुख्य सचिव,मा.मुख्यमंत्री यांचे कार्यालय यांनी दि.19/09/2017 रोजीचे बैठकीत दिलेल्या सूचनेनूसार दि.28/01/2014 रोजी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांपैकी 07 कामाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार केलेल्या सुधारीत अंदाजपत्रकीय नागरी सुविधा उप विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाडा यांचेकडून शक पूर्तता करुन 09/11/2020 रोजी अहवाल सादर करणेत आलेला आहे.

तसेच दि.28/01/2014 रोजी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामापैकी पाणी पुरवठा योजनेच्या कामास शासन निर्णय दि. 18/11/2017 अन्वये वितरीत निधीचा तपशिल :-

अ.क्र. नागरी सुविधा काम प्रशासकीय मान्यता र.रु. वितरीत निधी र.रु.
1) कुसवडे नेहळपाडा नळ पाणी पुरवठा योजना करणे 15,84,424/- 7,92,212/-
2) उचाट नळ पाणी पुरवठा योजना करणे 20,21,748/- 10,10,874/-
3) कुसवडे (तुसे)नळ पाणी पुरवठा योजना करणे. 20,57,215/- 10,28,608/-
एकुण 56,63,387/- 28,31,694/-

सदरचा निधी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग ठाणे यांचेकडे दि.1/02/2018 रोजी वितरीत करण्यात आला असून (1) मौजे तुसे (कुसवडे) नळ पाणी पुरवठा योजना, 2) तसेच कुसवडे निहालपाडा नळ पाणी पुरवठा योजना 3) उचाट नळ पाणी पुरवठा योजनेचे  काम पुर्ण करण्यात आलेले आहे. सदर कामांचा उर्वरीत निधी र.रु. 28,31,693/- अद्याप येणे प्रलंबित आहे.

14) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची सद्य:स्थिती उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सातारा यांनी त्यांचेकडील पत्र क्रं.पुनर्व/कोयना/कावि- 561/2014, दि. 1/4/2014 अन्वये 1968 पासून ठाणे (तत्कालीन )जिल्हयात वास्तव्यास असलेल्या तथापि आजतागायत पर्यायी जमीन मिळाली नसलेल्या 66 प्रकल्पग्रस्तांची पात्रता तपासून क पत्रकातील यादी या कार्यालयात जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील दि.24/09/2015 रोजीचे पत्रान्वये प्राप्त झाली आहे . सदर यादीतील 66 प्रकल्पग्रस्तांपैकी 61 प्रकल्पग्रस्त पालघर जिल्हयातील व उर्वरीत 05 प्रकल्पग्रस्त ठाणे जिल्हयातील आहे.

पालघर जिल्हयातील वाडा तालुक्यात वास्तव्यास असलेल्या 61 प्रकल्पग्रस्तांनी पर्यायी जमिनीची मागणी केली आहे. पालघर जिल्हयात एकसलग जमीन उपलब्ध नाही.

कोयना प्रकल्प बाधिता संदर्भात सातारा जिल्हयात प्रकल्पबाधितांचे अद्यावत माहिती संकलित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.  सदर माहिती संकलित झालेनंतर शासन स्तरावर जमीन वाटपाबाबत धोरण निश्चित केले जाणार आहे. तदनंतर जमीन उपलब्धतेनूसार वाटपाची कार्यवाही करणेची तजबीज ठेवली आहे.

15) नागरी सुविधा हस्तांतरण सद्य:स्थिती सदर प्रकल्पांतर्गत एकूण 18 नागरी सुविधा पुरविणेत आलेल्या असून सदरच्या नागरी सुविधा जिल्हा परिषदेकडे वर्ग करणेत आलेल्या आहेत.

अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघ यांचेकडील निवेदनातील मागण्यांच्या अनुषंगाने मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 03/07/2024 रोजी VC व्दोर बैठक आयोजित करणेत आली होती. सदर बैठकीत पुनर्वसाहतीकरीता महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1999 अन्वये नागरी सुविधा पुरविणेत आलेल्या आहेत. सदर पुरविणेत आलेल्या पूर्ण/अपूर्ण नागरी सर्व्हेक्षण उपविभागीय अधिकारी, वाडा यांचे समवेत करणेबाबतच्या सुचना दि.03/07/2024 रोजीचे बैठकीमध्ये देणेत आलेल्या होत्या. त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी, वाडा यांनी दि.04/07/2024 रोजी संबंधित कार्यकारी अभियंता, तहसिलदार वाडा, गट विकास अधिकारी वाडा, उप अधिक्षक, भूमि अभिलेख, वाडा यांचेसमवेत कोयना पुनर्वसन गावठाणास पुरविणेत आलेल्या पुर्ण/अपुर्ण नागरी सुविधांच्या अनुषंगाने सर्व्हेक्षण केले होते. त्याअनुषंगाने 1.उप कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, वाडा, 2. उप अभियंता, महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण, वाडा व 3. उप अभियंता (बांधकाम), वाडा यांचे नागारी सुविधा कामाचे प्रस्ताव प्राप्त करुन कोयना प्रकल्पग्रस्तांना देणेत आलेलया नागरी सुविधांची A) पुनर्वसन अधिनियमाअंतर्गत दयावयाच्या सुविधा, B) यापूर्वी दिलेल्या सुविधांची दुरुस्ती व C) पुनर्वसन अधिनियम देय सुविधांव्यतिरिक्त इतर सुविधांची मागणी अशा तीन प्रकारे वर्गवारी करुन सदरचे प्रस्ताव मान्यतेस्तव मा.विभागीय आयुक्त, कोंकण विभाग यांचेकडे दिनांक 06/07/2024 रोजीच्या पत्रान्वये सादर करणेत आले आहेत.

9.प्रकल्पाचे नांव :- वांद्री लघु पाटबंधारे प्रकल्प, ता.पालघर

1) प्रथम/अद्यावत प्रशासकीय मान्यता 1433.28 लक्ष (प्रथम प्रशासकी मान्यता दि.27/01/1977)
2) प्रकल्प चालू झाल्याचा दिनांक फेब्रवारी 1977
3) बाधित गावांची नावे मौजे जायशेत, खैर व गांजे
4) बाधीत क्षेत्र 566.00 हे.आर
5) प्रकल्पग्रस्तांची संख्या एकूण 105 कुटूंबे बाधित झालेले आहेत.
6) नवीन वसाहतीच्या गावठाणांची नावे सदर प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा पुनर्वसन केले असल्याने पुनर्वसनाचा प्रश्न राहिला नाही.
7) भूखंड वाटपाची सद्य:स्थिती सदर प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा पुनर्वसन केले असल्याने पुनर्वसनाचा प्रश्न राहिला नाही.
8) पर्यायी जमिन वाटपाची सद्य:स्थिती 65% रक्कम भरणा करुन जमिन मागणी न केल्याने पर्यायी जमिनीचा प्रश्न उदभवला नाही.
9) उदर निर्वाह भत्त्ता सद्य:स्थिती
10) घर बांधणी अनुदान सद्य:स्थिती
11) स्वेच्छा पुनर्वसन अनुदान सद्य:स्थिती
12) अधिसूचना प्रकल्प अधिसूचित नाही.
13) 18 नागरी सुविधांपैकी पूर्ण/अपूर्ण सदर प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा पुनर्वसन केले असल्याने नागरी सुविधांचा प्रश्न राहिला नाही.
14) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची सद्य:स्थिती सद्य:स्थितीत प्रकल्प पूर्ण आहे.
15) नागरी सुविधा हस्तांतरण सद्य:स्थिती सदर प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा पुनर्वसन केले असल्याने नागरी सुविधांचा प्रश्न राहिला नाही.

10.प्रकल्पाचे नांव :- तारापूर प्रकल्प टप्पा क्र. 3 व 4, ता.पालघर

1) प्रथम/अद्यावत प्रशासकीय मान्यता 25.89  (प्रथम प्रशासकी मान्यता सन 1989)
2) प्रकल्प चालू झाल्याचा दिनांक सन 1989
3) बाधित गावांची नावे मौजे पोफरण व अक्करपट्टी
4) बाधीत क्षेत्र 169.73.4 हे.आर
5) प्रकल्पग्रस्तांची संख्या 1250
6) नवीन वसाहतीच्या गावठाणांची नावे नवी अक्कपट्टी व नवी पोफरण
7) भूखंड वाटपाची सद्य:स्थिती नविन पुनर्वसित गावाच्या ठिकाणी अक्करपट्टी गावातील 517 व पोफरण गावातील 733 प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी एकुण 1250 घरे बांधण्यात आली आहेत. 1250 घरांपैकी 1247 प्रकल्पग्रस्तांनी घराचा ताबा घेतला असून 3 प्रकल्पग्रस्तांचा ठाव ठिकाणा सापडत नाही.
8) पर्यायी जमिन वाटपाची सद्य:स्थिती अक्करपट्टी व पोफरण येथील 334 प्रकल्पग्रस्तांना मौजे कोलवली, बावडा व वाणगांव,ता.डहाणु येथे पर्यायी जमीन वाटप करणेची असून यापैकी 273 प्रकल्पग्रस्तांनी  जमिनीचा ताबा घेतलेला आहे. उर्वरीत 61 प्रकल्पग्रस्तांपैकी 32 प्रकल्पग्रस्तांनी 65% रक्कम शासन जमा केली नाही व 29 प्रकल्पग्रस्तांचे पत्ते आढळ होत नाहीत.
9) उदर निर्वाह भत्त्ता सद्य:स्थिती
10) घर बांधणी अनुदान सद्य:स्थिती
11) स्वेच्छा पुनर्वसन अनुदान सद्य:स्थिती
12) अधिसूचना प्रकल्प अधिसूचित नाही.
13) 18 नागरी सुविधांपैकी पूर्ण/अपूर्ण पुनर्वसीत दोन्ही गावांना 18 नागरी सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.
14) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची सद्य:स्थिती सद्य:स्थितीत प्रकल्प पूर्ण आहे.
15) नागरी सुविधा हस्तांतरण सद्य:स्थिती सदर प्रकल्पांतर्गत एकूण 18 नागरी सुविधा पुरविणेत आलेल्या असून सदरच्या नागरी सुविधा जिल्हा परिषदेकडे वर्ग करणेत आलेल्या आहेत.

 11.प्रकल्पाचे नांव :- वाघ नदी लघु पाटबंधारे प्रकल्प, ता.पालघर

1) प्रथम/अद्यावत प्रशासकीय मान्यता 2566.06 लक्ष (प्रथम प्रशासकी मान्यता दि.09/06/1994)
2) प्रकल्प चालू झाल्याचा दिनांक सन 1994
3) बाधित गावांची नावे गावठाण बाधित होत नाही.
4) बाधीत क्षेत्र 566.00 हे.आर
5) प्रकल्पग्रस्तांची संख्या एकूण 83 कुटूंबे बाधित होत आहेत.
6) नवीन वसाहतीच्या गावठाणांची नावे गावठाण बाधित होत नसल्साने पुनर्वसनाचा प्रश्न राहिला नाही.

 

7) भूखंड वाटपाची सद्य:स्थिती वाघ नदी प्रकल्पासाठी पुनर्वसन नाही.
8) पर्यायी जमिन वाटपाची सद्य:स्थिती वाघ नदी प्रकल्पासाठी पुनर्वसन नाही.
9) उदर निर्वाह भत्त्ता सद्य:स्थिती
10) घर बांधणी अनुदान सद्य:स्थिती
11) स्वेच्छा पुनर्वसन अनुदान सद्य:स्थिती
12) अधिसूचना प्रकल्प अधिसूचित नाही.
13) 18 नागरी सुविधांपैकी पूर्ण/अपूर्ण गावठाण बाधित होत नसल्साने पुनर्वसनाचा प्रश्न राहिला नाही.
14) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची सद्य:स्थिती सद्य:स्थितीत प्रकल्प पूर्ण आहे.
15) नागरी सुविधा हस्तांतरण सद्य:स्थिती गावठाण बाधित होत नसल्साने पुनर्वसनाचा प्रश्न राहिला नाही.

 

12.प्रकल्पाचे नांव :- सुर्या प्रकल्प, ता.डहाणू

1) प्रथम/अद्यावत प्रशासकीय मान्यता 12167.94 (प्रथम प्रशासकीय मान्यता दि.01/09/1974)
2) प्रकल्प चालू झाल्याचा दिनांक सन 1976
3) बाधित गावांची नावे मौजे सावा, कुंज, कऱ्हे, तलावली, तिलोंडा, चांभारशेत, ता.जव्हार

मौजे कवडास, तलवाड, ता.विक्रमगड

मौजे भवाडी, धरमपूर, ता.डहाणू

4) बाधीत क्षेत्र 2161-0-00 हे.आर
5) प्रकल्पग्रस्तांची संख्या 1458
6) नवीन वसाहतीच्या गावठाणांची नावे मौजे वणई (चंद्रनगर), ता.डहाणू

मौजे शिगाव (हनुमानगर), ता.पालघर

7) भूखंड वाटपाची सद्य:स्थिती 518 प्रकल्पपिडीत कुटूंबांचे वणई, ता.डहाणू व शिगांव, ता.पालघर येथे शासनाने राखून ठेवलेल्या सरकारी जागेमध्ये पुनर्वसन केले आहे. उर्वरित 940 कुटूंबांनी स्वेच्छा पुनर्वसन केले आहे.
8) पर्यायी जमिन वाटपाची सद्य:स्थिती एकूण 364 प्रकल्पपिडीतांना 319.43.50 हे.आर क्षेत्र वाटप केले आहे.
9) उदर निर्वाह भत्त्ता सद्य:स्थिती
10) घर बांधणी अनुदान सद्य:स्थिती
11) स्वेच्छा पुनर्वसन अनुदान सद्य:स्थिती
12) अधिसूचना कलम 11 (1) दि.21/03/1978

कलम 13 (1) दि.20/02/1979

कलम 13 (3) 30/05/1979

13) 18 नागरी सुविधांपैकी पूर्ण/अपूर्ण

 

 

 

 

 

 

 

 

 

सुर्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित ठिकाणी खालीलप्रमाणे नागरीसुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.

अ.क्र. नागरी सुविधा कामे
1) खुल्या विंधन विहिरी 6) सार्वजनिक शौचकूप
2) शाळा व क्रिडांगण 7) वीज पुरवठा
3) चावडी व समाज मंदीर 8) एस टी स्थानके
4) अंतर्गत रस्ते व पोचमार्ग 9) बाजारासाठी जागा
5) उघडी गटारे 10) दहन/दफन
14) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची सद्य:स्थिती प्रकल्प ग्रस्त व्यक्तींचे पुनर्वसनाचे काम दि. 31/05/1985 पूर्वीच पूर्ण झाले आहे.
15) नागरी सुविधा हस्तांतरण सद्य:स्थिती मौजे वणई (चंद्रनगर), ता. डहाणू व मौजे शिगाव (हनुमानगर) ता. पालघर येथील प्रकल्पग्रस्त व्यक्तींचे पुनर्वसनाचे काम दि.31/05/1985 पूर्वीच पूर्ण झाले असून सन 1988 मध्ये जिल्हा परिषदेकडे सर्व एकूण 10 नागरी सुविधा वर्ग करण्यात आल्या आहेत.

 13.प्रकल्पाचे नांव :- 4 मुंबई मध्य वैतरणा पाणी पुरवठा प्रकल्प, ता.मोखाडा

1) प्रथम/अद्यावत प्रशासकीय मान्यता 46000 लक्ष (प्रशासकीय मान्यता दि.11/09/1997)
2) प्रकल्प चालू झाल्याचा दिनांक सन 1997
3) बाधित गावांची नावे मौजे विहीगाव व  माळ, जि.ठाणे

मौजे कोचाळे, कारेगाव, कडूची वाडी, करोळ, पाचघर, जि.पालघर

4) बाधीत क्षेत्र 121.73.8 हे.आर
5) प्रकल्पग्रस्तांची संख्या बाधित कुटूंब 98 बाधित लोकसंख्या 208
6) नवीन वसाहतीच्या गावठाणांची नावे मौजे विहीगाव
7) भूखंड वाटपाची सद्य:स्थिती एकूण पात्र 36 खातेदारांपैकी 33 खातेदारांना भूखंड वाटप केले आहेत. 3 खातेदारांनी स्वेच्छा पुनर्वसन स्विकारले आहे.
8) पर्यायी जमिन वाटपाची सद्य:स्थिती निरंक
9) उदर निर्वाह भत्त्ता सद्य:स्थिती
10) घर बांधणी अनुदान सद्य:स्थिती
11) स्वेच्छा पुनर्वसन अनुदान सद्य:स्थिती
12) अधिसूचना कलम 11 (1) दि.02/03/2006

कलम 13 (1) दि.08/09/2010

कलम 13 (3) दि.05/11/2011

13) 18 नागरी सुविधांपैकी पूर्ण/अपूर्ण

 

 

 

 

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पॅकेज दि.28/02/2012 रोजी मंजूरकरण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रकल्पास महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1999 चे कलम 10(3) अन्वये 18 नागरी सुविधांपैकी 14 नागरी सुविधा देण्याचे मंजूर करणेत आले होते. आतापर्यत 14 नागरी सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.
14) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची सद्य:स्थिती सदर प्रकल्पातील पुनर्वसनाची कार्यवाही  जिल्हाधिकारी ठाणे यांचे कार्यालयातून सूरु आहे.
15) नागरी सुविधा हस्तांतरण सद्य:स्थिती आतापर्यत 14 नागरी सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. नागरी सुविधा जिल्हा परिषद ठाणे यांचेकडे हस्तांतरीत करण्यात आलेल्या आहेत.

 14.प्रकल्पाचे नांव :- डोमहिरा लघु पाटबंधारे योजना, ता.जव्हार, जि.पालघर

1) अद्यावत प्रशासकीय मान्यता 2399.21 लक्ष दि.19/01/2001

7347.23 लक्ष दि.10/01/2011

2) प्रकल्प चालू झाल्याचा दिनांक सन 1977
3) बाधित गावांची नावे मौजे खडखड, ता.जव्हार
4) बाधीत क्षेत्र 685 हेक्टर
5) प्रकल्पग्रस्तांची संख्या बाधित कुटूंबे संखा 51
6) नवीन वसाहतीच्या गावठाणांची नावे खडखड व धापडपाडा
7) भूखंड वाटपाची सद्य:स्थिती सदर प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा पुनर्वसन केले असल्याने पुनर्वसनाचा प्रश्न राहिला नाही.
8) पर्यायी जमिन वाटपाची सद्य:स्थिती सदर प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा पुनर्वसन केले असल्याने पुनर्वसनाचा प्रश्न राहिला नाही.
9) उदर निर्वाह भत्त्ता सद्य:स्थिती
10) घर बांधणी अनुदान सद्य:स्थिती
11) स्वेच्छा पुनर्वसन अनुदान सद्य:स्थिती
12) अधिसूचना प्रकल्प अधिसूचित नाही.
13) 18 नागरी सुविधांपैकी पूर्ण/अपूर्ण             या प्रकल्पातील प्रकल्पबाधित लोकांनी स्वेच्छा पुनर्वसन स्विकारल्याने पुनर्वसन अधिनियमानुसार स्वेच्छा     पुनर्वसनातंर्गत नागरी सुविधा पुरविण्याची तरतुद नाही.
14) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची सद्य:स्थिती सद्य:स्थितीत प्रकल्प पूर्ण आहे.
15) नागरी सुविधा हस्तांतरण सद्य:स्थिती सदर प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा पुनर्वसन केले असल्याने नागरी सुविधांचा प्रश्न राहिला नाही.

15.प्रकल्पाचे नांव :- उपराळे लघु पाटबंधारे प्रकल्प, ता.विक्रमगड

1) प्रथम/अद्यावत प्रशासकीय मान्यता निरंक
2) प्रकल्प चालू झाल्याचा दिनांक सदर प्रकल्पाचे काम सन 1982 मध्ये सुरु करणेत आले होते परंतू वन जमिनीचा प्रश्न असल्याने काम मध्ये बंद झाले.
3) बाधित गावांची नावे सदर प्रकल्पांतर्गत एकूण 2 गावे बाधित होत आहेत.
4) बाधीत क्षेत्र 56.31.0 हे.आर
5) प्रकल्पग्रस्तांची संख्या उपराळे ल.पा. प्रकल्पांतर्गत 47 कुटूंबे बाधित झाली आहेत.

 

6) नवीन वसाहतीच्या गावठाणांची नावे मौजे टेटवाली
7) भूखंड वाटपाची सद्य:स्थिती एकूण 47 कुटूंबाना भूखंड वाटप करणेत आले आहेत.
8) पर्यायी जमिन वाटपाची सद्य:स्थिती सदर प्रकल्पाचे लाभक्षेत्र 200.00 हे. पेक्षा कमी असल्याने पर्यायी जमिन वाटप केली नाही.
9) उदर निर्वाह भत्त्ता सद्य:स्थिती
10) घर बांधणी अनुदान सद्य:स्थिती
11) स्वेच्छा पुनर्वसन अनुदान सद्य:स्थिती
12) अधिसूचना सदर प्रकल्प अधिसूचित नाही.
13) 18 नागरी सुविधांपैकी पूर्ण/अपूर्ण वन जमिनीचा प्रश्न असल्याने काम मध्ये बंद झाले.
14) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची सद्य:स्थिती वन जमिनीचा प्रश्न असल्याने काम मध्ये बंद झाले.
15) नागरी सुविधा हस्तांतरण सद्य:स्थिती वन जमिनीचा प्रश्न असल्याने काम मध्ये बंद झाले.

16.प्रकल्पाचे नांव :- कैनाड ग्रामिण पाणी पुरवठा प्रकल्प, ता.डहाणू

1) प्रथम/अद्यावत प्रशासकीय मान्यता निरंक
2) प्रकल्प चालू झाल्याचा दिनांक सदर प्रकल्पाचे काम सन 1977 मध्ये सुरु करणेत आले होते परंतू वन जमिनीचा प्रश्न असल्याने काम मध्ये बंद झाले.
3) बाधित गावांची नावे कैनाड, ता.डहाणू
4) बाधीत क्षेत्र 92.45.0 हे.आर
5) प्रकल्पग्रस्तांची संख्या कैनाड ल.पा. प्रकल्पांतर्गत 185 कुटूंबे बाधित झाली आहेत.
6) नवीन वसाहतीच्या गावठाणांची नावे पुनर्वसन गावठणे नाहीत.
7) भूखंड वाटपाची सद्य:स्थिती वन जमिनीचा प्रश्न असल्याने काम मध्ये बंद झाले.
8) पर्यायी जमिन वाटपाची सद्य:स्थिती सदर प्रकल्पाचे लाभक्षेत्र 200.00 हे. पेक्षा कमी असल्याने पर्यायी जमिन वाटप केली नाही.
9) उदर निर्वाह भत्त्ता सद्य:स्थिती
10) घर बांधणी अनुदान सद्य:स्थिती
11) स्वेच्छा पुनर्वसन अनुदान सद्य:स्थिती
12) अधिसूचना सदर प्रकल्प अधिसूचित नाही.
13) 18 नागरी सुविधांपैकी पूर्ण/अपूर्ण वन जमिनीचा प्रश्न असल्याने काम मध्ये बंद झाले.
14) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची सद्य:स्थिती वन जमिनीचा प्रश्न असल्याने काम मध्ये बंद झाले.
15) नागरी सुविधा हस्तांतरण सद्य:स्थिती वन जमिनीचा प्रश्न असल्याने काम मध्ये बंद झाले.

 

 

. क्र. पदनाम अधिकारी /कर्मचाऱ्यांचे नांव वर्ग ईमेल/ मोबाईल नंबर
1 उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) पालघर श्री. तेजस चव्हाण dcrehabpalghar@gmail.com

मो.नं. 9226941304

0252523915

2 सहायक महसुल अधिकारी श्री.राजेंद्र शांताराम शिंदे dcrehabpalghar@gmail.com

मो.नं. 9226941304

0252523915

3 मंडळ अधिकारी श्री.प्रदिप रामा सारोक्ते dcrehabpalghar@gmail.com

मो.नं. 9226941304

0252523915

4 महसूल सहायक श्री.प्रियंका बोरोळे dcrehabpalghar@gmail.com

मो.नं. 9226941304

0252523915

5 ग्रामविकास अधिकारी  पद रिक्त आहे.
6 भूमापक पद रिक्त आहे.
7 वाहन चालक

(बाहययंत्रणा)

पद रिक्त आहे.
8 शिपाई

(बाहययंत्रणा)

पद रिक्त आहे.