बंद

एसडीओ वाडा

वाडा तालुका पालघर जिल्ह्यातील  वाडा उपविभागात समाविष्ट आहे. तो पालघर जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात आहे. वाडा तालुक्याची आग्नेय सीमा ठाणे जिल्ह्याशी, पूर्वेकडील सीमा मोखाडा तालुक्याशी आहे आणि उत्तरेला विक्रमगड आणि जव्हार तालुक्यांना लागून आहे. वाडा तालुक्याची पश्चिम सीमा पालघर तालुक्याशी आहे आणि पालघर जिल्हा मुख्यालय वाड्यापासून ४६ किमी अंतरावर आहे.  २०११ च्या जनगणनेनुसार, वाडा तालुक्याची एकूण लोकसंख्या १,७८,३७० आहे, ज्याचा साक्षरता दर ६३.१५% आहे. वाडा तालुक्यात अनुक्रमे वाडा, कुडूस, कोने, कांचाड, खानिवली, मेट आणि मांडवा अशी ७ मंडळे आहेत.

वाडा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ७०,०४३ हेक्टर आहे आणि त्यात १७२ महसूली गावे आणि ८४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वाडा नगर पंचायतीचे कार्यक्षेत्र शहराच्या नागरी लोकसंख्येचे आहे.

वाडा तालुक्यातील एक उल्लेखनीय धार्मिक स्थळ म्हणजे तिलासे गावातील प्राचीन शंकर मंदिर. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त तिलासे मंदिरात एक मेळा भरतो, ज्यामध्ये हजारो भाविक येतात. जवळच, सुप्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देखील आहे. वाडा तालुक्याला लागून तानसा, भातसा, लोअर, मिडल आणि अप्पर वैतरणा धरणे आहेत, जी मुंबई आणि ठाणे शहरांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे प्रमुख स्रोत आहेत. वाडा येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे फटाके घाऊक बाजार आहे.

 

वाडा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र खालीलप्रमाणे आहे.

 

भौगोलिक क्षेत्रफळ 700 चौ.किमी.
हवामान उष्ण,दमट व सम
लोकसंख्या 1,78,370
लगतचे तालुके व जिल्हे दक्षिण पुर्व: ठाणे जिल्हा

पूर्व: मोखाडा

उत्तर: विक्रमगड, जव्हार

पश्चिम: पालघर

 

 

इतिहास

वाडा तालुका हा ब्रिटीश कालखंडात निर्माण करण्यात आलेला असुन वाडा तालुका मुख्यालयाची  तहसिल कार्यालयाची  ब्रिटीशकालीन इमारत सन 1902 साली बांधण्यात आलेली असुन आजही  मजबूत स्थितीत आहे

सांस्कृतिक वारसा

वाडा तालुक्यातील बहुसंख्य लोकसंख्येमध्ये वारली, कातकरी आणि महादेव कोळी जमाती आहेत, ज्यांना अनुसूचित जमाती म्हणून वर्गीकृत केले आहे. आदिवासी समुदायांनी वारली कला आणि तारपा नृत्याद्वारे त्यांची जीवनशैली व्यक्त केली आहे.

वारली  चित्रकारी आदिम काळापासून म्हणजेच जेव्हा मनुष्य वास्तव्य करीत होता त्या काळापासून म्हणजे साधारणपणे 1100 वर्षापासून जतन केलेली आहे. या चित्रकलेमध्ये आदिवासी  समाजाच्या विविध चालीरीती  तसेच  दैनंदिन होणाऱ्या घडामोडी, आदिवासींच्या दैनंदिन जीवनात होणारे प्रसंग उदा. लग्न, नृत्य विवध सण निसर्गातील घडामोडी अशा प्रकारचे प्रसंग उत्तम प्रकारे चित्ररुपाने दाखवले जातात. ही चित्रे कुठल्याही प्रकारचा  रासायनिक रंग न वापरता निसर्गापासुन मिळणाऱ्या  वस्तु, उदा.माती, तांदळाचे पीठ, वनस्पतीजन्य रंग व बांबूच्या काड्यांचे ब्रश वापरुन काढली जातात. ही कला आदिवासींच्या जीवनशैलीच्या विविध पैलुंवववर  प्रकाश टाकणारी चित्रकला असून या चित्रकलेला भारतात तसेच परदेशात खूप मागणी  आहे.

 

वाडा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी  2013 पासुन

अ.क्र. उपविभागीय अधिकारी यांचे नांव कालावधी
1 श्री.हरिश्चंद्र पाटील 15/08/2013 ते 15/09/2016
2 डॉ.मोहन नळदकर 16/09/2016 ते 11/06/2018
3 श्रीम.अर्चना कदम 12/06/2018 ते 08/08/2021
4 डॉ.भवानजी आगे पाटील 09/08/2021 ते 05/08/2021
5 डॉ.संदीप चव्हाण 06/08/2024 ते आजपर्यंत
अ. क्र नाव पदनाम ईमेल दूरध्वनी
श्री. संदीप चव्हाण उपविभागीय अधिकारी, वाडा sdowada[at]gmail[dot]com 02526-271422

मतदार संघ

वाडा तालुक्याचे क्षेत्र 22- पालघर (अ.ज)  23- भिवंडी या लोकसभा मतदार संघात येत आहे.

लोकसभा मतदर संघ क्रमांक मतदार संघाचे नांव राखीव
22 पालघर अनुसूचित जमाती
23 भिवंडी

 

वाडा तालुक्याचे क्षेत्र 129-विक्रमगड (अ.ज) 134 भिवंडी ग्रामीण (अ.ज.)  135 शहापूर विधानसभा मतदार संघात येत आहे.

विधानसभा मतदार संघ क्रमांक मतदार संघाचे नांव राखीव
129 विक्रमगड अनुसूचित जमाती
134 भिवंडी ग्रामीण अनुसूचित जमाती

 

उद्योग-सातव्या पंचवार्षिक योजनेखाली दाखविलेल्या सर्व योजना आठव्या पंचवार्षिक योजनेत अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत.

या योजने अंतर्गत लहान व कुटीर उद्योग करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्याबाबत भर देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ व कोंकण विकास महामंडळाने स्थापन केलेल्या ओद्योगिक वसाहती एमएसएसआयडीसी वुडबेसड कॉम्पलेक्स, वाडा क्षेत्रफळ-२२ एकर ,प्लॉट संख्या -१९

विशाल प्रकल्प सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत वाडा तालुक्यात एकुण ८ विशाल प्रकल्प प्रस्तावित आहेत.

वाडा तालुक्याचा काही भाग डोंगराळ असून उर्वरित भाग प्रामुख्याने सपाटीचा आहे. लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. प्रामुख्याने भात व नागली यांची शेती केली जाते. याशिवाय जंगलातील लाकूडफाटा गोळा करणे व जंगलातील मध,लाख व औषधी वनस्पती इत्यादी गोण उत्पादने गोळा करणे हा देखील व्यवसायाचा एक भाग आहे.

वाडा तालुक्यात औद्योगिेक पट्टा  अस्तित्वात आहे. या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती व पूरक व्यवसाय निर्मीती झाली आहे. वाडा तालुक्यात ओनिडा,कोकाकोला कंपनी,ब्ल्युस्टार कंपनी सारखे कारखाने आहेत.

 

औद्योगिक घटकाचे नांव

अ.क्र. उद्योग घटकाचे नांव
1 ओनिडा इलेक्ट्रॉनिक्स फॉमरली मिर्क इलेक्ट्रॉनिक कंपनी लि.
2 ब्लू स्टार कंपनी
3 जय भवानी इस्पात प्रा.लि.
4 घासिराम स्टील इंडस्ट्रीज प्रा.लि.
5 झिको इंडीया प्रा.लि.
6 हिंदुस्थान कोकाकोला कंपनी वाडा
7 मास्टर इंडिया प्रा.लि.