वाडा तालुका पालघर जिल्हयातील तालुका असून त्याचे स्थान वाडा उपविभागात आहे. वाडा तालुका हा पालघर जिल्हयात पुर्व बाजूला आहे. वाडा तालुक्याच्या दक्षिण पुर्व बाजूला ठाणे जिल्हयाची, पुर्व बाजूला अंशत: मोखाडा तालुक्याची सीमा लागून आहे. तसेच उत्तरेला विक्रमगड, जव्हार तालुके असून पश्चिमेला पालघर तालुका आहे. जिल्हा मुख्यालयापासून तालुका मुख्यालयाचे अंतर 46 कि.मी. अंतरावर आहे. वाडा तालुक्याची 2011 च्या जनगणनेनुसार एकुण लोकसंख्या 1,78,370 एवढी आहे. वाडा तालुक्यात साक्षरतेचे प्रमाण 63.15 % आहे. वाडा तालुक्यात एकुण 7 महसूल मंडळे असून त्यात वाडा, कुडूस, कोने, कंचाड,खनिवली, मेट व मांडवा या मंडळाचा सामावेश आहे.
वाडा तालुक्याचे एकुण भौगोलिक क्षेत्र 70043 हे.आर असून त्यामध्ये 172 महसूली गावे व 84 ग्रामपंचायती आहेत. तसेच वाडा तालुक्यात वाडा नगरपंचायत ही कार्यरत आहे.
वाडा तालुक्यामध्ये मौजे-तिळसे येथे प्रसिद्ध असलेले शंकराचे मंदिर आहे . तेथे दरवर्षी महाशिवरात्री या दिवशी मोठी यात्रा भरते . हजारो भाविक तेथे दर्शनासाठी येतात. तेथे जवळच विठठल रखुमाईचे प्रसिद्ध मंदिर आहे.
वाडा तालुक्याच्या बाजूला तानसा, भातसा, लोअर, मध्य व अप्पर वैतरणा ही मुंबई, ठाणे शहरांसाठी पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची धरणे आहेत.
महाराष्ट्रातील फटाक्यांसाठी सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ वाडा येथे आहे.
भौगोलिक माहिती
भौगोलिक क्षेत्रफळ | 700 चौ.किमी. |
हवामान | उष्ण, दमट व सम |
लोकसंख्या | 1,78,370 |
लगतचे तालुके व जिल्हे | दक्षिण पुर्व – ठाणे जिल्हा
पुर्व:- मोखाडा उत्तर – विक्रमगड, जव्हार पश्चिम- पालघर |
वाडा तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 2400 मि.मि. एवढे आहे.
वाडा तालुक्यात काही: डोगर असून बराचसा भाग वनव्याप्त आहे. तसेच सपाट जमिन आहे.
वाडा तालुक्याची सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 1,78,370 एवढी आहे.
वाडा तालुका शेजारील तालुक्यांशी रस्ते या मार्गाने जोडलेला आहे. वाडा तालुक्यातून भिवंडी -वाडा-मनोर रज्य महामार्ग जात आहे.