बंद

भौगोलिक माहिती

भौगोलिक क्षेत्रफळ ४,६९६.९९ चौ.कि.
हवामान गरम आणि दमट ( अधिकतम: ४०.६ अंश सेल्शिअल न्यूनतम ८.३ अंश सेल्शिअल) पर्जन्यमान : २२९३ मी मी
लोकसंख्या २९,९५,४२८
लगतचे जिल्हे उत्तर : वलसाड / दादर आणि नगर हवेली
ईशान्य : नाशिक
पूर्व : ठाणे
दक्षिण : ठाणे
नैऋत्येस : बृहन्मुंबई
पश्चिम:अरबी समुद्र

पालघर या जिल्ह्यास एकून ११२ कि.मी एवढया लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे .

जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान सामुरे २४५८ मि.मि. एवढे आहे .

भौगोलिक रचनेनुसार जिल्हयाचे साधारणत :तीन विभाग पडतात

पहिला विभाग हा सहयाद्रिच्या डोंगर रंगांकडील असून तो ‘जंगलपट्टी’ या नावाने ओळखला जातो . यामध्ये प्रामुख्याने जव्हार ,मोखाडा ,विक्रमगड हे तालुके मोडतात .

दुसरा विभाग ‘बंदरपट्टी’ म्हणून ओळखला जातो . यामध्ये वसई ,पालघर ,डहाणू,तलासरी हे तालुके मोडतात .

तिसरा विभाग सापाटीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो . यामध्ये वाडा तालुका मोडतो .

पालघर या नवनिर्मित जिल्ह्याची सन २०११ ची एकूण लोकसंख्या २९,९५,४२८ एवढी आहे . नागरी व ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी पाहता ,नागरी लोकसंख्या १३,५२,२८३ एवढी आहे. ग्रामीण लोकसंख्या १६,४३,१४५ आहे.

जिल्ह्य मुख्यालयपसुन मुंबईचे अंतर सुमारे ११० कि.मी आहे .

जिल्ह्याचे मुख्यालय पालघर येथे असून रस्ते व रेल्वेने इतर तालुक्यांशी जोडलेले आहेत. यामध्ये डहाणू वसई हे तालुके रेल्वे व रस्ते या दोन्ही मार्गानी जिल्ह्य मुख्यालयाशी जोडलेले आहेत.

पालघर मनोर वाडा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक ३४ ने वाडा विक्रमगड,जव्हार हे तालुके जोडलेले आहेत . जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २० कि.मी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -८(मुंबई आहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ) हा मार्ग जात असून डहाणू व तलासरी हे तालुके जोडलेले आहेत