बंद

तलासरी तहसील

तलासरी तालुका पालघर जिल्हयातील 8 तालुक्यांपैकी बहुतांशी (90.73) टक्के आदिवासी बहुल तालुका आहे. तालुका केंद्र शासीत प्रदेश दादरा नगर हवेली व गुजरात  राज्य यांच्या सिमा भागेवर वसलेला आहे. तालुक्याच्या मध्य भागातुन मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-8 जात आहे. तालुक्याचे 2011 च्या जनगणनेनुसार एकुण 154818 लोकसंख्या आहे. त्यापैकी 76417 पुरुष व 7840‍1 ‍ स्त्रियांचे प्रमाण आहे. तालुक्यात झरी,तलासरी अशी दोन महसुल मंडळे असुन, एकुण 13 तलाठी सजा आहेत.

तालुक्याचे भौगोलीक क्षेत्रफळ 26711 हेक्टर आहे. तालुक्यात तालुका मुख्यालयी तलासरी नगरपंचायत कार्यरत असुन 21 ग्रामपंचायती व 41 महसुल गावे व 214 पाडे आहेत. तसेच जिल्हा ‍परिषदेचे एकुण 5 गट व पंचायत समितीचे 10 गण आहेत.

तालुक्यात वारली, धोडीया,कोकणा, कातकरी, जमाती प्रामुख्याने आढळुन येते यामध्ये वारली समाजीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. या तलासरी तालुक्यामध्ये धोडीया,वारली, कोकणी भाषा बोलली जाते. तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती असुन, प्रामुख्याने भात हे मुख्य पीक असून हे पीक पावसावर अवलंबुन आहे. तलासरी तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालय सेवाभावी संस्था शैक्षणिक संस्था,बँक,पोस्ट, पोलीस स्टेशन, इत्यादी सोयी सुवीधा आहेत.

तलासरी तालुक्यातील झाई समुद्र किनारा, करंजगाव येथील कुंड, कुर्झे येथील धरण (दापचरी डॅम) प्रसिद्ध आहेत.

सांस्कृतिक वारसा

तालुक्यात वारली, धोडीया,कोकणा, कातकरी, जमाती प्रामुख्याने आढळुन येते यामध्ये वारली समाजीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. या तलासरी तालुक्यामध्ये धोडीया,वारली, कोकणी भाषा बोलली जाते. यामध्ये उपलाट गटामध्ये डावर,वारली झाई गटामध्ये कोकणी, धोडीया,भाषा प्रामुख्याने बोलली जाते. वारली कलाचित्र हे तालूक्यात लोकप्रिय व प्रचलित आहे. तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे. पर्यटन नकाशावर तलासरी तालुक्यातील झाई समुद्र किनारा, करंजगाव येथील कुंड, कुर्झे येथील धरण(दापचरी डॅम) प्रसिद्ध आहेत.

मतदार संघ

पालघर 22-लोकसभा मतदार संघ हा महाराष्ट्र राज्यातील 48 मतदारसंघापैकी एक आहे. हा मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव आहे.

मतदार संघ

पालघर जिल्हयातील 6 विधानसभा मतदार संघापैकी  128  डहाणु विधानसभा (अ.ज.) मतदार संघ  एक आहे. त्यामध्ये डहाणु व तलासरी मिळुन एक मतदार संघ आहे.

भौगोलिक माहीती-

भौगोलीक क्षेत्रफळ- 267.18 चौ.किमी.

हवामान-गरम  आणि दमट

लोकसंख्या-154818

लगतचे तालुके-डहाणु, वापी,उमंरगांव,सिल्वासा, इत्यादी

तलासरी तालुक्यास झाई हा हे सुंदर गाव वसलेले आहे व त्यागावास समुद्र किनारा लाभलेला आहे.

तलासरी  मुख्यालयापासुन  मुंबईचे अंतर सूमारे 180 किमी आहे.

तलासरी तालुक्यातील कार्यालय निहाय  महत्वाचे दुरध्वनी क्रमांक

अ.क्र. कार्यालयाचे नाव दुरध्वनी क्रमांक ईमेल
1 तहसिल कार्यालय तलासरी 02521-299110 tahtalasari@gmail.com
2 मुख्याधिकारी, नगरपंचायत कार्यालय तलासरी 02521-299620 nptalasari@gmail.com
3 गटविकास  अधिकारी, पंचायत समिती तलासरी 02521-220036 bdotalasari@gmail.com
4 उप अधिक्षक,भुमी  अभिलेख कार्यालय तलासरी  

02521-220333

dyslrtalasari21@gmail.com

Dyslrtalasari@yahoo.in

5 उपनिबंधक कार्यालय तलासरी    
6 तालुका कृषी अधिकारी,कार्यालय तलासरी 8329940195 agritatalasaripstn@gmail.com
7 उप अभियंता, सा.बां. उपविभाग कार्यालय तलासरी 7875380854 talasari.de@mahapwd.gov.in
8 उप अभियंता, महावितरण कार्यालय तलासरी 9028154204 aetalasari@gmail.com
9  व बालविकास प्रकल्प कार्यालय, तलासरी 8806510454 icdstalasari@gmail.com
10 तालुका आरोग्य अधिकारी,कार्यालय तलासरी 8087252893 Thottalasari1@gmail.com
11 उप कोषागार अधिकारी,कार्यालय तलासरी   Sto1604dat.pal-mh@gov.in
12 पोलीस निरीक्षक

तलासरी पोलीस स्टेशन

8669607056 talasaripstn@gmail.com

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अधिसूचित सेवा

महायोजना

https://mahaschemes.maharashtra.gov.in

नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच ऑनलाईन व्यासपीठावर उपलब्ध व्हावी या उद्देशाने ‘महायोजना’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या संकेतस्थळावर नागरिकांना विविध विभागाच्या योजनांची माहिती मिळते. योजनेचा शासन निर्णय, पात्रतेचे निकष,अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, लाभ मिळण्यास लागणारा कालावधी, संबंधित अधिकारी अशा अनेक मुद्यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे. या शिवाय प्रत्येक विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रिय कार्यालयांची व अधिकाऱ्यांची माहिती तसेच दूरध्वनी क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. नागरिकाला योजनेची माहिती घेऊन योजनेचा लाभ घेणेसाठी आवश्यक तयारी करुन योग्य अधिकारी व कार्यालयाशी संपर्क साधणे  या संकेतस्थळामुळे शक्य होईल. यामुळे मोठया प्रमाणावर वेळेची व श्रमाची बचत होईल.

अर्ज कसा करावा

महा योजनांची वेबसाइट (https://mahaschemes.maharashtra.gov.in) योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी नागरिकांना योजनांची माहिती मिळवून देण्यास मदत करेल. नागरिक आणि नागरिकांच्या वेळेची बचत होईल

संजय गांधी निराधार योजना

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

कुर्झे धरण

Kurze_Dam

तलासरी तालुक्यात वरोली नदीवर कुर्झे धरण असुन धरणाची उंची २२.९६ मीटर (७५.३ फूट) तर लांबी २,५०७.७६ मीटर (८,२२७.६ फूट) आहे. त्याचे आकारमान ८४६.१२  किमी  (२०२.९९ घन मैल) आहे आणि एकूण साठवण क्षमता ३९,०५०.०० किमी  (९,३६८.५९ घन मैल) आहे.,कुर्झे धरणात मोकळ्या जागेत तसेच पाणथळ परिसरात हिवाळी हंगामात विविध स्थलांतरीत पक्ष्यांची गर्दी वाढते. यामध्ये लहान करकोचे, लहान, मध्यम व मोठे बगळे, वंचक, सूरय, तुतारी, देशी तुतारी, वटवट्या, सोंकपाल, कापसी, राखी, जांभळे बगळे, पाणडुबी, काळ्या डोक्याचा शाराटी, टिटवी व पाणकोंबड्या आदी छोट्या-मोठ्या आकाराचे पक्षी मुक्त विहार करताना नजरेस पडतात. याशिवाय भारतातील विविध भागांतील पक्षीही येथे स्थलांतर करून आल्याचे दिसून येत आहे. अडई-लेसर व्हसलिंग डक, धनवर (हळदीकुंकू बदक), स्पॉट बिल्ट डक, काणूक- कॉटन पिग्मी गुज इत्यादी विविधरंगी रानबदके या हंगामात आढळून येत असतात.

झाई बीच

झाई बीच समुद्रकिनारा उंच नारळाच्या झाडांनी वेढलेला आहे आणि पांढर्‍या वालुकामय समुद्रकिनाऱ्यांनी नटलेला आहे. समुद्रकिनारा देखील मासेमारीसाठी एक लोकप्रिय गंतव्यस्थान आहे आणि अनेक मासेमारी गावांनी वेढलेला आहे. अभ्यागत मच्छिमारांना त्यांच्या दैनंदिन वस्तू आणताना आणि स्थानिक बाजारातून ताजे सीफूड खरेदी करताना पाहू शकतात.

Zai Beach

 

बल्लाळगड

बल्लाळगड हा महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील एक डोंगरी किल्ला आहे. काजळी गावातील छोट्याश्या टेकडीवर बल्लाळगड हा टेहळणीचा किल्ला होता. बल्लाळगडाच्या माथ्याच्या अलीकडे एका झाडाखाली एक वीरगळ ठेवलेला आहे.  वीरगळ पाहून बलाळगडाच्या माथ्याकडे चालत गेल्यास चार बुरुजांनी व तटबंदीने संरक्षित केलेला बल्लाळगडाचा माथा लागतो. त्यावरच्या ४ बुरुजांचे आणि तटबंदीचे अवशेष आज २१व्या शतकातही पाहायला मिळतात. तटबंदी १५ फ़ूट उंच असून ५ फ़ूट रुंद आहे. प्रचंड मोठे दगड वापरून ती तटबंदी बनवलेली आहे. तटबंदीमधे शौचकूप बनवलेले पाहायला मिळतात. तटबंदीच्या आत दोन मोठे हौद आहेत.

Ballal gad