डहाणू तहसील
डहाणू केवळ सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठीच नव्हे, तर समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसासाठी देखील ओळखले जाते. डहाणू तालुक्यात वारली, कातकरी, धोडी, दुबळा, कोंकणा, मल्हार कोळी या आदिवासी समाजाची संख्या मोठया प्रमाणावर आहे येथे पारंपरिक वारली संस्कृती, पारशी समुदायाचा वारसा, आणि चिकू बागांचे अनोखे मिश्रण पाहायला मिळते.
१. वारली संस्कृती आणि कला
जगप्रसिध्द वारली पेंटींगचा उगम डहाणू तालूक्यात झालेला असून श्री जीव्या म्हसे यांनी वारली पेंटींग या क्षेत्रात उत्तम काम केल्याबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.वारली चित्रकलेमध्ये भित्तीचित्रामध्ये निसर्ग, सण, आणि दैनंदिन जीवन यांचे सुंदर चित्रण असते. तारपा नृत्य, वारली महोत्सव, आणि विविध पारंपरिक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात
2.पारशी समाजाचा वारसा
पारशी समाजाच्या अग्नि मंदिरांमुळे धार्मिक महत्त्व आहे.
पारशी खाद्यसंस्कृती येथे विशेष लोकप्रिय आहे
डहाणू किल्ला
डहाणू किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात स्थित एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला पोर्तुगीज आणि मराठ्यांच्या काळात महत्त्वाचा संरक्षणात्मक किल्ला म्हणून ओळखला जात असे.हा किल्ला अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत असल्यामुळे त्याला नैसर्गिक संरक्षण मिळाले आहे.किल्ल्यातून समुद्राचा सुंदर नजारा दिसतो आणि तो पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे
डहाणू समुद्र किनारा
डहाणू बीच महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील स्वच्छ आणि निसर्गाने नटलेला समुद्रकिनारा आहे.जो मुंबईपासून सुमारे 140 किमी अंतरावर आहे. नारळाच्या झाडांनी वेढलेला हा किनारा चिकू बागायती, सुंदर सूर्यास्त, आणि निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे
- औष्णिक विदयुत प्रकल्प
डहाणू येथे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (पूर्वीची बीएसईएस) संचालित डहाणू थर्मल पॉवर स्टेशन (DTPS) हा महत्त्वाचा औद्योगिक प्रकल्प आहे. मुंबई आणि उपनगरांना वीजपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक केंद्र आहे. हे एक कोळसा आधारित असून त्याची क्षमता 500 मेगावॅट आहे. डहाणू इको-सेंसिटिव्ह झोन असल्याने प्रदूषण नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना केल्या जातात.
- लघु उदयोग
डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे डायमेकिंग लघुउद्योग जगप्रसिध्द आहे. डहाणूतील डाय मेकिंग उद्योग हा उत्पादन क्षेत्राच्या वाढीला हातभार लावणारा महत्त्वाचा घटक आहे,
ज्यामुळे स्थानिक रोजगार आणि आर्थिक विकासास मदत होत आहे.
- वाढवण बंदर
केंद्र सरकारनं पालघर मधील डहाणू तालुक्यामधील वाढवणमध्ये ऑल वेदर ग्रीनफील्ड
बंदराच्या निर्मितीला मान्यता दिली आहे.सुमारे 76000 कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाची
पायाभरणी करण्यात आली आहे वाढवण बंदर हे जगातील 10 मोठ्या बंदरापैकी एक असणार आहे.
अ. क्र | नाव | पदनाम | ईमेल | दूरध्वनी |
१ | श्री. सुनील कोळी | तहसीलदार, डहाणू | tahdahanu[at]gmail[dot]com | 8286333999 |