बंद

एसडीओ डहाणू

डहाणू हा पालघर जिल्हयातील एक आदिवासी बहुल तालुका आहे. तसेच डहाणू तालुका हा मुख्यत्वे डोंगरी व सागरी भागात वसलेला आहे. डहाणू तालुक्याचे क्षेत्रफळ 1,256.54 चौ.किमी असून एकूण लोकसंख्या 4,02,095 आहे. डहाणू तालुक्याच्या उत्तरेस तलासरी तालुका व गुजरात राज्याची सीमा, दक्षिणेस पालघर तालुका, पुर्वेस जव्हार व विक्रमगड तालुका व पश्चिमेस अरबी समुद्र आहे.

डहाणू तालुक्याची रचना ही पुर्वेस डोंगराळ व आदिवासी भाग विखुरलेला असून पश्चिमेस समुद्रकिनारपट्टी आहे. तालुक्यातुन मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 8 जातो. सदर राष्ट्रीय महामार्गावर तवा, घोळ, चारोटी, महालक्ष्मी, विवळवेढे, धानीवरी, दापचरी ही डहाणू तालुक्यातील गावे आहेत. डहाणू तालुक्यातून लोहमार्ग जात असून सदरील लोहमार्गावर वाणगाव, डहाणू, घोलवड व बोर्डी ही स्थानके आहेत. डहाणू तालुक्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन भात शेती आहे. तालुक्यात मुख्यत: रिलायन्सचा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. तसेच चिंचणी येथील डायमेकिंग लघुउद्योग जगप्रसिध्द आहे. डहाणू तालुक्यात फुगा बणवणाऱ्या कंपनी देखील उद्योगात अग्रेसर आहेत. युनिव्हर्सल कॅप्सुल लि. आशागड, मेहेर डिस्टीलरीज लि. असे नामांकित उद्योग आहेत. जगप्रसिध्द चिकू डहाणू तालुक्यातील घोलवड या गावी पिकवले केले जातात. डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चिकू व नारळ तसेच इतर फळबागामध्ये लिची, आंबे, फणस, केळी इत्यादी यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. समुद्रकिनारी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली जाते, त्यामध्ये मिरची, वॅनीला, टोमॅटो यांचे लागवड क्षेत्र जास्त असून दररोज मुंबईच्या बाजारपेठेला पुरवठा केला जातो. तालुक्यातींल साखरे, कवडासा व सुर्या प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी तसेच शेती साठी देखील वापरले जाते.

Dahanu Beach_1Dahanu_Beach_Photo

डहाणू तालुक्यात डहाणू समुद्र किनारा, बोर्डी येथील समुद्र किनारा, डहाणू फोर्ट व चिंचणी समुद्र किनारा ही पर्यटनाची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. तसेच विवळवेढे येथील महालक्ष्मीचे जागृत देवस्थान, आशागढ येथील श्री संतोषी माता मंदिर व नरपड येथील श्री साईबाबा मंदिर, कोसबाड येथे जैन मंदिर ही धार्मिक स्थळेहि आहेत. डहाणू तालुक्यात वारली, कातकरी, धोडी, दुबळा, कोंकणा, मल्हार कोळी या आदिवासी समाजाची संख्या मोठया प्रमाणावर आहे. जगप्रसिध्द वारली पेंटींगचा उमग डहाणू तालूक्यात झालेला असून श्री जीव्या म्हसे यांनी वारली पेंटींग या क्षेत्रात उत्तम काम केल्याबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.

 डहाणू तालुक्यात आदिवासी लोकसंख्या आहे. वारली चित्रकला व तारपा नृत्य ही तालुक्याची सांस्कृतिक ओळख आहे.

Varali painting 2Varli Painting 1

डहाणू तालुका नकाशा

Map_Dahanu_

भौगोलिक माहिती

भौगोलिक क्षेत्रफळ 1,256.54 चौ.किमी.
हवामान उष्ण व दमट
लोकसंख्या 4,02,095

डहाणू तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 2600 मि.मि. एवढे आहे.

डहाणू तालुक्यात काही: डोगर असून बराचसा भाग वनव्याप्त आहे. तसेच सपाट जमिन आहे.

लोकसंस्कृती

डहाणू तालुक्यात भारतीय नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी वेगवेगळ्या गावातील गावजत्रांना सुरुवात होते. प्रमुख गावजत्रा खालीलप्रमाणे आहेत.

  1. गावदेवी मंदीर,चिंचणी
  2. घोलवड, मरवडा मत्स्य जयंती
  3. नरपड, साईबाबा मंदीर आगर,केवडा देवी
  4. विवळवेढे, महालक्ष्मी देवी

 

डहाणू तालुक्यात आदिवासी लोकसंख्या आहे. वारली चित्रकला व तारपा नृत्य ही तालुक्याची सांस्कृतिक ओळख आहे.

Varali painting 2Varli Painting 1

डहाणू तालुक्यातील चिकू प्रसिध्द आहे.

डहाणू – घोलवड परिसरातील चिकू खूप प्रसिध्द आहेत. या फळाला 2016 मध्ये भौगोलिक मानांकन मिळालं आहे.

ChikooChikoo Gholwad_Dahanu

अ.क्र. नाव पदनाम ईमेल दुरध्वनी क्रमांक
श्री.सत्यम गांधी उपविभागीय अधिकारी, डहाणू sdodahanu[at]gmail[dot]com 7827650759
उपविभागीय अधिकारी यांचे नाव कालावधी
श्री. अे. जे. पुरोहीत 17/07/1974 ते 19/09/1976
श्री. एस. ए. पवार 20/09/1976 ते 07/08/1979
श्री. चांद गोयल 08/08/1979 ते 04/06/1982
श्री. एन. एन. पटेल 05/06/1982 ते 31/05/1983
श्री. वाय. ए. जोशी 01/06/1983 ते 08/08/1983
श्री. एन. जी. साळवी 09/08/1983 ते 04/08/1986
श्री. डी. ए. लाड 05/08/1986 ते 21/06/1986
श्री. एस. आर. हजारे 22/06/1987 ते  04/06/1990
श्री. बी. के. नाईक 04/06/1990 ते 07/05/1992
श्री. जी. डी. पवार 04/06/1990 ते 07/05/1992
श्री.  विलास पाटील 16/06/1993 ते 25/05/1995
श्री.  एम. एस. जगताप 25/05/1995 ते 10/04/1997
श्री.  गणेश पाटील 11/04/1997 ते 31/08/1998
श्री.  डॉ. एच. ए. मुखर्जी 01/09/1998 ते 16/08/1999
श्री.  गणेश पाटील 17/08/1999 ते 30/06/2000
श्री.  एस. एस. ससाणे 01/07/2000 ते 22/05/2003
श्री.  अमोल यादव 23/05/2003 ते 29/04/2006
 माया पाटोळे 29/04/2006 ते 06/03/2009
श्री. डॉ. एन. एम. जरे 07/03/2009 ते 13/06/2011
श्री.  जलसिंग वळवि 14/06/2011 ते 27/08/2011
श्री.  डॉ. शैलेश नवाल (भा.प्र.से) 28/08/2012 ते 04/02/2014
श्री. जलसिंग वळवि (प्रभारी) 05/02/2014 ते 19/02/2014
श्री.  भरत बास्टेवाड 20/02/2014 ते 07/08/2014
डॉ. शिवाजी दावभट (प्रभारी) 08/08/2014 ते 10/08/2014
श्री.  अशोक एच. मुंडे 11/08/2014 ते 31/08/2014
श्रीम. अंजली भोसले 01/09/2014 ते 15/09/2016
श्रीम. प्रशाली जाधव – दिघाचकर 16/09/2016 ते 10/01/2017
श्रीम. आंचल सूद –गोयल (भा.प्र.से) 11/01/2017 ते 01/05/2018
श्री. विकास गजरे (प्रभारी) 01/05/2018 ते 04/05/2018
श्री. ज्ञानेश्वर खुटवड 05/05/2018 ते 31/05/2018
श्री. विलास गजरे (प्रभारी) 01/06/2018 ते 18/09/2018
श्री. प्रसाद उकर्डे 18/09/2018 ते 08/10/2018
श्री. सौरभ कटियार (भा.प्र.से) 08/10/2018 ते 21/07/2020
श्री. प्रजित नायर (भा.प्र.से) 21/07/2020 ते 31/08/2020
श्रीम. आशिमा मित्तल –अग्रवाल (भा.प्र.से) 01/09/2020 ते 30/09/2022
श्री. सुरेंद्र नवले (प्रभारी) 30/09/2022 ते 24/10/2022
श्रीम. संजिता महापात्र (भा.प्र.से) 25/10/2022 ते 01/02/2024
श्री. रविंद्र राजपूत (प्रभारी) 02/02/2024 ते 22/02/2024
श्री. अभिजीत देशमुख (प्रभारी) 22/02/2024 ते 12/03/2024
श्री. रविंद्र राजपूत (प्रभारी) 13/03/2024 ते 14/03/2024
श्री. सत्यम गांधी, (भा.प्र.से) 15/03/2024 पासून