विक्रमगड तालुका हा पालघर जिल्हाचा मध्यवर्ती ठिकाणी असुन त्याची निर्मिती सन 26 जून १९९९ रोजी झाली. बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. या तालुक्याचा बराचशा भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-या खो-याचा आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 55037 चौ.कि.मी.असुन त्यापैकी 20759 हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे.तालुक्यात सरासरी 2500 ते 3000 मी.मी. पर्जन्यमान आहे. या तालुक्यात एकूण 95 गांव व 4२ ग्रामपंचायती असुन सन 2011 च्या जनगणेनुसार एकूण 1,37,625 इतकी आहे.त्यामध्ये पुरूष- 69,136 व स्त्रिया- 68,489 एवढी आहे. विक्रमगड हे ठिकाण पालघर जिल्हातील नव्याने अस्तित्वात आलेले तालुक्याचे ठिकाण आहे.पूर्वेला जव्हारचा घाट,सहयाद्रीच्या रांगातील वतवड्या सुळका दिसतो. नैऋत्येला कोहोज किल्ला दिसतो.विक्रमगड तालुक्याच्या पश्चिमेस पालघर जिल्हा व वायव्येला डहाणू तालुका आहे.दक्षिणेस वाडा तालुका आहे. महालक्ष्मी डोंगराच्या अलिकडे व पूर्व पश्चिम पहुडलेला मातेरा डोंगर दिसतो.या डोंगराच्या सखल भागात देहर्जे खो-यात वसलेले विक्रमगड हे तालुक्याचे ठिकाण आहे.विक्रमगड तालुक्यात उन्हाळा,पावसाळा व हिवाळा हे तिन्हीही ऋतू प्रामुख्याने प्रकर्षाने जाणवतात. जुलै व ऑगस्ट या महिन्यामध्ये पर्जन्यवृष्टी मोठया प्रमाणवर होते.या तालुक्यांतील भात शेती प्रमुख पीक असुन संपुर्ण शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.भात शेती बरोबरच डोंगराळ भागात नागली,वरई व खुरासणी इत्यादी पिके घेतली जातात. पुर्वीच्या जव्हार संस्थांनातील कारभारामध्ये विक्रमगडला कुडाण असे नांव होते.कुडाण हे गांव त्याकाळी सरहद्यीचे परकीयांना अटकाव करणारे संरक्षण भिंतीप्रमाणे कार्य करत
होते. या कुडाण गावामध्ये संस्थांनाधिपती विक्रमसिंह महाराज यांचे पुर्वीचे हे संस्थांन मलवाडा येथे होते, त्यामुळे कुडाण या गांवाला विशेष महत्व प्राप्त झाले होते. जव्हारचे नरेश यशवंतराव महाराज यांच्या वाढदिवसाचे अवचित साधुन 10 डिसेंबर 1947 रोजी कुडाणचे विक्रमगड असे नामकरण केले.विक्रमगड मधील पिंजाळ नदीवरील श्री.गोरक्षनाथ महादेव मंदिर प्रसिध्द आहे. विक्रमगड तालुक्यामधील नागझरी गावातील पांडव कालीन श्री नागेश्वर मंदिर हे शिवमंदिर प्रसिध्द आहे.
विक्रमगड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. मुख्यालय असलेल्या विक्रमगड शहरात नगरपंचायत आहे. १) तालुक्यातील झडपोली येथे शासकीय तंत्रनिकेतन इंजिनियर कॉलेज आहे. CBSC शाळा,मोफत पुस्तक वाचनालय ,भगवान सांबरे रुग्णालयात मोफत उपचार 2) औंदे येथे महाविद्यालय आहे B.A. B.com. B.Sc. 3) तालुक्यातील कावळे येथे पिंजाळ नदी च्या काठी गोरक्षनाथ मठ आहे.महाशिवरात्री च्या दिवशी येथे यात्रा भरते.
विक्रमगड तालुक्यामध्ये मोठयाप्रमाणा मध्ये आदिवासी,कोकणा,कुणबी, वारली,ठाकुर, महादेव कोळी,मल्हार कोळी,ढोरकोळी व कातकरी इत्यादी जाती जमातीचे लोक रहातात.
विक्रमगडमधील आदिवासी तारपानृत्य विशेष प्रसिध्द असुन वारली चित्रकला विशेष लक्षवेधक आहे. विक्रमगडची सांस्कृतिक परंपरा म्हणजे तारपानृत्य व ढोलनाद होय. दसरा या सणाला सर्व आदिवासी आपआपल्या गांवात तारपानृत्य करीत असतात. विविध देवदेवतांचे मुखवटे घालून येथे बोहाडा उत्सव साजरा करण्यात येतो.
इतिहास
पुर्वीच्या जव्हार संस्थांनातील कारभारामध्ये विक्रमगडला कुडाण असे नांव होते.कुडाण हे गांव त्याकाळी सरहद्यीचे परकीयांना अटकाव करणारे संरक्षण भिंतीप्रमाणे कार्य करत होते.असे या कुडाण गांवामध्ये संस्थांनाधिपती विक्रमशहा महाराज यांनी आले पुर्वीचे ठाणे मलवाडा येथे स्थलांतरीत केले त्यामुळे कुडाण या गांवाला विशेष महत्व प्राप्त झाले. जव्हारचे नरेश यशवंतराव महाराज यांच्या वाढदिवसाचे अवचित साधुन 10 डिसेंबर 1947 रोजी कुडाणचे विक्रमगड असे नामकरण केले.विक्रमगड मधील देहर्जे नदीवरील श्री.पंतगेश्वराचे महादेव मंदिर प्रसिध्द आहे. पांडव कालीन श्री नागेश्वर मंदिर हे शिवमंदिर प्रसिध्द आहे.जांभे गांवाजवळ पलुचा धबधबा प्रसिध्द आहे. विक्रमगड तालुक्यामध्ये मोठयाप्रमाणा मध्ये आदिवासी, कोकणा, कुणबी, वारली, ठाकुर, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोरकोळी व कातकरी इत्यादी जाती जमातीचे लोक रहातात.