बंद

वनहक्क

अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006 अंतर्गत वनवासी अनुसूचित जमाती तसेच इतर पारंपारिक वनवासी यांचे हक्क्‍ निश्चीत करुन प्रदान करण्यात पालघर जिल्हा  देशात तसेच राज्यातही प्रथम क्रमांकावर आला आहे.

पालघर जिल्हयात आजपर्यंत 50923 वैयक्तिक दावे मंजुर झाले असून त्यांचे क्षेत्र  30063.440 हे. आर इतके आहे. संपुर्ण देशाचा विचार करता देशामध्ये एकुण 23,73,714 इतके वैयक्तिक दावे मंजुर झाले असुन त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा 1,98,504 इतका आहे. त्यापैकी 50,930 वैयक्तिक दाव्यांच्या मंजूरीसह पालघर जिल्हा देशात तसेच राज्यात वनहक्क दावे मंजुर करणेबाबत अग्रस्थानी आहे. प्रलंबीत वनहक्क दावे निकाली काढण्याचे कामकाज अंतिम टप्यात आहे. तसेच सामुहिक वनहक्क दावे- 499 मंजुर केले असून त्यांचे क्षेत्र 29,767.05 हे. आर इतके मंजुर आहे.

पालघर जिल्हयात आजपर्यंत मंजूर वनपट्टे बाबत तालुक्यानुसार माहिती खालीलप्रमाणे.

 

अ.क्र उपविभाग तालुका वैयक्तिक सामुहिक
 एकुण मंजुर दावे  एकुण मंजुर दावे क्षेत्र (हे.आर) एकुण मंजुर दावे एकुण मंजुर दावे क्षेत्र (हे.आर)
1 जव्हार जव्हार 8521 4659.281 51 2575.15
2 मोखाडा 2519 2041.176 33 1476.93
3 वाडा वाडा 6077 3283.37 60 1519.11
4 विक्रमगड 8321 4400.570 24 784.20
5 डहाणू डहाणू 15894 10865.3 106 10337.15
6 तलासरी 3335 1716.225 35 312.40
7 पालघर पालघर 4719 2361.454 151 10899.66
8 वसई वसई 1537 736.0809 39 1862.45
जिल्हा पालघर 50923 30063.440 499 29767.05

 

वननिवासी अनुसूचित जमाती व  इतर पारंपारिक वनवासी यांच्या उपजिवीकेचे व अन्न सुरक्षेची सुनिश्चती करतांनाच जैव विविधतेचा निरंतर वापर, संवर्धन आणि पारिस्थितीक समतोल

राखण्याचे काम  शासनाच्या निर्देशाप्रमाणे पालघर जिल्हा प्रशासन करीत आहे.

  • महाराष्ट्र शासन आदीवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक वहका-२०१६/प्र.क्र.८२/का-१४ दिनांक ०१ ऑक्टोबर २०१६ (जिल्हा स्तरीय कन्व्हर्जन्स समितीची स्थापना करणेबाबत )

 

  • महाराष्ट्र शासन आदीवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक वनहका-2014/ प्र.क्र.66/का-14 दिनांक 24 जुन 2015 (सामूहीक वनहक्क समितीगठीत व कार्याबाबत )

 

  • महाराष्ट्र शासन आदीवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक वहका-2017/प्र.क्र.77/का-14 दिनांक 06 जुलै 2017 (सामुहीक वनहक्काचे संवर्धन आणि व्यवस्थापन आराखडे तयार करणेबाबत )
  1. शाळा
  2. दवाखाना किंवा रुग्‍नालय
  3. आंगणवाडया
  4. रास्‍तधान्‍य दुकाने
  • विद्यूत व दुरसंदेश वाहक तारा
  1. टाक्‍या किंवा अन्‍य गौन जलाशये
  2. पिण्‍याचा पाण्‍याचा पुरवठा व जलवाहीन्‍या (पाईप लाईन)
  3. पाणी किंवा पावसाच्‍या पाण्‍यावरील शेतिची संरचना
  4. लहान सिंचन कालवे (छोटे कालवे,पाट)
  5. अपारंपारिक ऊर्जा साधने
  6. कौशल्यामध्‍ये वाढ करणारी किंवा व्‍यवसाय प्रशिक्षण केंद्रे
  7. रस्‍ते
  8. सामाजिक केंद्रे (स्‍मशानभुमी)
  9. गोदाम,वखार,शितगृह
  10. स्‍मशानभुमी ,दफन भुमि

 

मा.राज्‍यपाल यांची अधिसुचना दिनांक 23/02/2017 नुसार स्‍मशानभुमी ,दफन

भुमि या सुविधा अंतर्भुत करण्यात आलेल्या आहेत.

  • गठित केलेल्‍या समित्‍या किंवा आयोगांचे अहवाल, शासकिय आदेश, अधिसुचना, परिपत्रके, ठराव. सार्वजनिक दस्तऐवज, राजपत्रे, जनगणना, सर्व्‍हेक्षण व समजोता अहवाल, नकाशे, उपग्रहीय चित्रे, कार्ययोजना, व्‍यवस्‍थापन योजना, सुक्ष्‍मयोजना, वनचौकशी अहवाल, इतर वन अभिलेख,पटटा किंवा भाडे पटटा या सारखे शासकिय अभिलेख,
  • मतदार ओळखपत्र, शिधावाटप पत्रीका, पासपोर्ट, घरपटटीच्‍या पोच पावत्‍या,अधिवास प्रमाणपत्रे यासारखे शासनाने प्राधिकृत केलेले दस्तऐवज
  • घर झोपडया व जमिनीवर केलेल्‍या स्‍थायी सुधारणा, जसे समतलन, बांधबांधणे, रोधी बांध व तत्‍सम इतर भौतिक गुणविशेष
  • न्‍यायालयीन आदेश, व न्‍यायनिर्णय यांचा समावेश असलेले न्‍यायिकत्‍व व न्‍यायिक अभिलेख
  • कोणत्‍याही वनहक्‍काचा उपभोग दर्शविणा-या आणी रुढीगत कायद्याचे बळ असणा-या रुढींचा व परंपराचा भारतिय मानववंशशास्‍त्रीय सर्वेक्षण संस्‍थे सारख्‍या नामांकित संस्‍थेने केलेला संशोधनात्‍मक अभ्‍यास व लेखांकन
  • भुतपुर्व प्रांतीक राज्‍य किंवा प्रांत किंवा अशा मध्‍यस्‍थ संस्‍थांकडून मिळालेला कोणताही अभिलेख यात नकाशे, हक्‍कनोंदणी, विशेषाधिकार, सट अनुग्रह यांचा अंतर्भाव असेल.
  • प्राचिनत्व सिध्‍द करणाऱ्या,विहीरी, दफन भुमी, पवित्र स्‍थळे यांसारख्‍या पारंपारिक रचना.
  • पूर्विच्‍या भूमिअभिलेखात नमुद केलेली व्‍यक्तिंच्‍या पुर्वजांचा माग काढणारी किंवा पूर्वीच्‍या काळी त्‍या गावातील कायदेशीर रहिवासी असल्‍याची ओळख पटविणारी वंशावळ.
  • मागणिदारा खेरीज अन्‍य वडीलधाऱ्या व्‍यक्‍तीचे लेखी जबाब/ बयाण
  • सामूहिक हक्‍क जसे निस्‍तार सारखे हक्‍क
  • पारंपारिक चराई मैदाने, मुळे व कंद, वैरण, वन्‍य खादयफळे, व इतर गौण वनोत्‍पादणे. मच्‍छीमार क्षेत्रे , सिंचन व्‍यवस्‍था, मनुष्‍य किंवा पशूंच्‍या वापरासाठी पाण्‍यांचे स्‍त्रोत, औषधी वनस्‍पती गोळा करणा-या वनस्‍पती व्‍यवसायांचे भूप्रदेश
  • स्‍थानिक समूहाने बांधलेल्‍या रचनेचे अवशेष पवित्र झाडे, देवराई, तळी किंवा नदीक्षेत्रे ,दफन किंवा दहन भूमी.

 

  • ग्रामसभा आयोजन.
  • सामुहिक वनहक्‍क व्‍यवस्‍थापन समितीचे (CFRMC) गठण.
  • प्राप्‍त सामुहिक वनहक्‍काचे सिमांकण करणे.
  • सामुहिक वनहक्‍क व्‍यवस्‍थापन नियमावली तयार करणे व ग्रामसभेची मंजुरात घेणे.
  • विकास नियोजन आराखडा तयार करणे व ग्रामसभेची मंजुरात घेणे.
  • ग्रामसभेने मंजुर केलेला विकास नियोजन आराखडा वन विभागाच्‍या कार्य

आयोजना मध्‍ये समाविष्‍ट करणे.

  • विकास नियोजन आराखडा नुसार आलेली कामे विविध शासकिय विभागालाविभाग निहाय प्रस्‍ताव सादर करणे. (Convergence.)
  • सादर केलेल्‍या प्रस्‍तावांचा पाठपुरावा घेणे.
  • मंजुर कामाचे अंमलबजावणी,सनियंत्रण आणि मुल्‍यांकण.
  • नियमित ग्रामसभेचे आयोजन करणे.