बंद

प्रशासकीय रचना

जिल्हा पालघरचे प्रशासकीय काम मुख्यत्वे जिल्हाधिकारी यांचेकडून केले जाते. जिल्हाधिकारी किंवा डीएम जिल्ह्यातील काही इतर शासकीय विभागांच्या कामकाजावर देखरेख करतात. जिल्हा परिषद सर्व ग्रामीण स्तरावर विकास व्यवस्थापन प्रदान करते. जिल्हाधिकारी पालघर जिल्ह्याच्या प्रशासनासाठी मुख्यतः जबाबदार आहेत आणि ते जिल्हा महसूल प्रशासनाचे प्रमुख आहेत आणि जिल्हा समन्वयक अधिकारी म्हणून काम करतात. जिल्हा प्रशासनाच्या सर्व काम मुख्यत्वे जिल्हाधिकारी यांचे देखरेखीखाली असतात आणि ते इतर सर्व विभागांना जबाबदार असतात.