तालुक्याविषयी माहिती :
- पालघर तालुका सागरी, नागरी, डोंगरी अशा भौगोलिक क्षेत्र लाभलेला तालुका आहे. तालुका अशंत: आदिवासी बहूल तालुका आहे. तालुक्याला उत्तरेस डहाणू तालुका हद्द, दक्षिणेस वसई तालुका हद्द, पूर्वस विक्रमगड व वाडा तालुका हद्द, पश्चिमेस अरबी समुद्र आहे. तालुक्याच्या मध्य भागातुन मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-8 जात आहे. तालुक्याचे 2011 च्या जनगणनेनुसार एकुण 550166 लोकसंख्या आहे. त्यापैकी 288514 पुरुष व 261652 स्त्रियांचे प्रमाण आहे. तालुक्यात पालघर, माहिम, आगरवाडी, सफाळा, दहिसर तर्फे मनोर, मनोर, लालोंडे, बोईसर, तारापूर, कोळगाव अशी दहा महसुल मंडळे असुन, एकुण 63 तलाठी सजा आहेत.
- तालुक्याचे भौगोलीक क्षेत्रफळ 102503-14-7 हेक्टर आर आहे. तालुक्यात पालघर नगरपरिषद कार्यरत असुन, 133 ग्रामपंचायती व 224 महसुल गावे आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे एकुण 17 गट व पंचायत समितीचे 34 गण आहेत.
- तालुक्यात वारली, धोडीया, कोकणा, कातकरी या आदिवासी जमाती तसेच वंजारी, कोळी, आगरी, भंडारी, इतर जाती प्रामुख्याने आढळुन येते. तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती असुन, प्रामुख्याने भात हे मुख्य पीक असून हे पीक पावसावर अवलंबुन आहे. तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा मुख्यालय, शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था, बँक, पोस्ट, पोलीस स्टेशन, सेवाभावी संस्था, इत्यादी सोयी सुवीधा आहेत.
- पालघर तालुका स्वतंत्र चळवळीतील एक महत्वाचे ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळखले जाते. 1942 भारत छोडो आंदोलन मध्ये पालघर स्टेशन अवघ्या 100 मीटर अंतरावर पालघर शहरातील मध्यवर्ती ठिेकाणी कै. काशिनाथ हरी पागधरे, रा. सातपाटी, कै. गोविंद गणेश ठाकूर, रा. नांदगाव, कै. रामचंद्र भिामाशंकर तिवारी, रा. पालघर, कै. महादेव चुरी, रा. मुरबे, कै. सुकुर गोविंद मोरे, रा. शिरगाव या पाच स्वातंत्र सैनिकांना ब्रिटीश पोलीस अधिकारांनी केलेल्या गोळीबारात हुत्तामे प्राप्त झाले. सदरचे ठिकाण सद्यस्थितीमध्ये हुत्तामा चौक म्हणून प्रसिध्द आहे. दरवर्षी स्वातंत्र दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट या दिवशी या पाच हुत्तामांना लोकप्रतिनिधी, प्रशासन, सामाजिक संस्था व नागरिकांतर्फे पुष्पचक्र आदरांजली देण्यात येते.
- भौगोलिक माहीती :
- भौगोलीक क्षेत्रफळ- 102503-14-7 हेक्टर आर.शेती योग्य जमीनीचे क्षेत्रफळ- 7077.56 हे.आर.पडीक जमीनीचे क्षेत्रफळ- 22528 हे.आर.हवामान- गरम आणि दमटलोकसंख्या- 550166 (सन 2011 जणगणनेनुसार)तालुके चतुर्सिमा – उत्तर- डहाणू तालुका हद्द,दक्षिण- वसई तालुका हद्द,
पूर्व- विक्रमगड व वाडा तालुका हद्द,
पश्चिम- अरबी समुद्र आहे.
- पालघर तालुक्यामध्ये वैतरणा, सुर्या व देर्हेजे अशा बारामाही वाहणाऱ्या नदया आहेत. तालुक्यामध्ये वांद्रे, देहर्जे व मासवण येथे धरणे आहेत. व माहिम, देवखोप, मनोर, व झांझरोळी येथे बंधारे आहेत.
- पालघर तालुक्यामध्ये तारापूर येथे केंद्र शासनाचा अणु विद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे. या अणु विद्युत प्रकल्पाच्या परिसरामध्ये मोठी नागरी वस्ती असून तारापूर औद्योगिक क्षेत्र आहे.
पालघर मुख्यालयापासुन मुंबईचे अंतर सूमारे 110 किमी आहे.