महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ व कोंकण विकास महामंडळाने स्थापन केलेल्या ओद्योगिक वसाहती एमएसएसआयडीसी वुडबेसड कॉम्पलेक्स, वाडा क्षेत्रफळ-२२ एकर ,प्लॉट संख्या -१९
विशाल प्रकल्प सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील एकूण १५ विशाल प्रकल्पांना महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली असून यापैकी ७ प्रकल्पांनी उत्पादन सुरु केले आहे. तालुकानिहाय प्रकल्पांची यादी जोडलेली आहे. वाडा तालुक्यात एकुण ८विशाल प्रकल्प प्रस्तावित आहेत.
पालघर जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता , जंगलपट्टी , बंदरपट्टी व पठारी प्रदेश असे ढोबळ मानाने भौगोलिक विभाग पडतात . या भौगोलिक परिस्थितीचा परिणाम तेथील लोकांचे राहणीमान व व्यवसाय यांचेवर झालेला दिसून येतो . जव्हार, मोखाडा व विक्रमगड या डोंगराळ जंगलपट्टी भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे .
या भागात प्रामुख्याने भात व नागली यांची शेती केली जाते . तसेच आलिकडच्या काळात हळद लागवडीचा प्रयोग देखिल यशस्वी झालेला आहे . याशिवाय जंगलातील लाकुडफाटा गोळा करणे व जंगलातील मध , लाख व औषधी वनस्पती इत्यादी गौण उत्पादाने गोळा करणे हा देखिल व्यवसायाचा एक भाग आहे .
बंदरपट्टी भागामध्ये मासामारी हा प्रमुख व्यवसाय आहे . तसेच त्यावर आधारित मासे सुकविणे , कोळंबी संवर्धन प्रकल्प इत्यादी व्यवसाय केले जातात . बंदरपट्टी भागामध्ये मासामारी हा प्रमुख व्यवसाय आहे . तसेच त्यावर आधारित मासे सुकविणे , कोळंबी संवर्धन प्रकल्प इत्यादी व्यवसाय केले जातात . पालघर तालुक्यातील सातपाटी , दातिवरे , मुरबे ,नवापुर , दांडी , आलेवाडी ,नांदगांव बंदर तसेच वसई तालुक्यातील नायगांव ,पाचु बंदर, किल्ला बंदर, अर्नाळा तसेच डहाणु तालुक्यामधील बोर्डी, चिंचणी व डहाणु या ठिकाणी मासेमारीसाठी प्रमुख बंदरे आहेत .
मासे टिकविण्यासाठी शीतगृहे तसेच तसेच आईस कारखाना या व्यवसायात देखिल रोजगार निर्मिती होते . पालघर तालुक्यातील सातपाटी येथून पापलेट व कोळंबी या माशांची निर्यात केली जाते .
जिल्हयातील सपाट पठारी प्रदेशामध्ये औद्योगिक पट्टे अस्तित्वात आहेत .यामध्ये मुख्यतः कापड उद्योग , रासायनिक कारखाने , अभियांत्रिकी उद्योग ,स्टील उद्योग इत्यादीचा समावेश आहे . बोईसर येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे औद्योगिक विभागात टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील , विराज स्टील , यासारख्या पोलाद निर्मिती करणारे कारखाने आहेत. तसेच डि-डेकॉर , सियाराम यासारख्या कापड निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत.
या उद्योगामुळे या परिसरात मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती व पूरक व्यवसाय निर्मिती झालेली आहे . तसेच येथून मोठया प्रमाणात निर्यात होऊन परकीय चलन मिळते . वाडा तालुक्याला हा ‘ड’ वर्गीय औद्योगिक दर्जा प्रपात झालेला आहे . वाडा तालुक्यामध्ये ओनिडा , कोकाकोला यासारखे कारखाने आहेत .
वसई तालुक्यातील वसई , विरार , नालासोपारा या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र विकसीत झालेले आहे .
तसेच डहाणु तालुक्यातील चिंचणी व पालघर तालुक्यातील तारापुर येथे घरोघरी पारंपारिक डायमेकींग हा प्रमुख व्यवसाय केला जातो .