बंद

जिल्ह्याविषयी


सागरी-डोंगरी अन् नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ पासून नव्याने पालघर हा राज्यातील ३६वा जिल्हा अस्तित्वात आला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली. पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा आहे.कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पुर्वेकडे असणार्या सहयाद्री पर्वत रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टी दरम्यान पसरला आहे. पालघर जिल्हाची एकूण लोकसंख्या २९,९०,११६ एवढी आहे. पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे.
पालघर जिल्हाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४६९६९९ हेक्टर असून त्यामध्ये एकूण १००८ गावे व ३८१८ पाडे आहेत. तसेच ४७७ ग्रामपंचायती आहेत.पालघर जिल्हातील साक्षरतेचे प्रमाण ६६.६५% आहे. त्यामधील पुरूषांचे प्रमाण ७२.२३% इतके आहे तसेच महिलांचे प्रमाण ५९.२८% इतके आहे.

Guardian Minister
मा.श्री.दादाजी दगडू भुसे पालकमंत्री
District Magistrate
डॉ. कैलास बी. शिंदे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी

कार्यक्रम

प्रदर्शित करण्यासाठी कोणताही कार्यक्रम उपलब्ध नाही
 • नागरिकांचा कॉल सेंटर -
  155300
 • बाल हेल्पलाइन -
  1098
 • महिला हेल्पलाइन -
  1091
 • क्राइम स्टापर -
  1090
 • बचाव आणि मदत - 1070
 • रुग्णवाहिका -
  102, 108
 • कोरोना हेल्पलाईन -
  02525-297474,
  02525-252520
अधिक ...

छायाचित्र दालन

 • प्रदर्शित करण्यासाठी कोणतीही पोस्ट नाही