Close

EGS

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हा – पालघर
अधिकारी / कर्मचारी ( जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर)
अधिकारी/ कर्मचाऱ्याचे नाव पद कार्यालयाचे नाव मोबाईल क्र.
श्रीम. विजया जाधव उप जिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर ९८२०७१७५७९
श्रीम. मनिषा पिंपळे नायब तहसीलदार (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर ७७३८२४०६७४
रिक्त सहाय्यक लेखाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर
श्रीम. वर्षा पानझडे अव्वल कारकुन जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर ८२७५२४०५४३
श्रीम.पुष्पा डुकरे लिपिक जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर ८४५९४७४१८४
रिक्त तक्रार निवारण‍ प्राधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर
श्री. सौरभ विनोद सावे जिल्हा MIS समन्वयक जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर ९०२८२७७३६३
श्री. जयेश सदाशिव घरत तांत्रिक सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर ७२७६५७७७७४

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हा – पालघर
अधिकारी / कर्मचारी ( तहसिलद कार्यालय, डहाणू)
अ.क्र अधिकारी/ कर्मचाऱ्याचे नाव पद कार्यालयाचे नाव मोबाईल क्र.
श्री. सुनिल कोळी तहसिलदार तहसिल कार्यालय, डहाणू ८२८६३३३९९९
श्री.  सुरेखा करमोडा अव्वल कारकुन तहसिल कार्यालय, डहाणू ८३७८०१५४३२
श्री. संदिप ठाकरे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तहसिल कार्यालय, डहाणू ९६८९९०४३१६
श्री. देऊ भोंडवा तांत्रिक सहाय्यक तहसिल कार्यालय, डहाणू ९५२९२६२९५०
श्री. शेखर शिंदे तांत्रिक सहाय्यक तहसिल कार्यालय, डहाणू ८२०८६६१५०६

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हा – पालघर
अधिकारी / कर्मचारी ( तहसिलद कार्यालय, जव्हार)
अधिकारी/ कर्मचाऱ्याचे नाव पद कार्यालयाचे नाव मोबाईल क्र.
श्रीम. लता धोतरे तहसिलदार तहसिल कार्यालय, जव्हार ८७६७१४९८६७
श्री. भराडे अव्वल कारकुन तहसिल कार्यालय, जव्हार ९७६३५०२७२९
श्रीम. राणी अखाडे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तहसिल कार्यालय, जव्हार ८२०८६६१५०६
श्री. स्वप्नील केनी तांत्रिक सहाय्यक तहसिल कार्यालय, जव्हार ९६५७२७७८३५
श्री. हृतीक सातवी तांत्रिक सहाय्यक तहसिल कार्यालय, जव्हार ७०६६६२५८८५

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हा – पालघर
अधिकारी / कर्मचारी ( तहसिलद कार्यालय,मोखाडा)
अधिकारी/ कर्मचाऱ्याचे नाव पद कार्यालयाचे नाव मोबाईल क्र.
श्री. मयुर र्खेंगले तहसिलदार तहसिल कार्यालय, मोखाडा ९६२३५०८१४५
श्रीम. संगीता पवार अव्वल कारकुन तहसिल कार्यालय, मोखाडा ७४९९०३२१०५
श्री. तोसिफ मनियार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तहसिल कार्यालय, मोखाडा ९२२४३५७२४६
श्री. गजेंद्र खैरनार तांत्रिक सहाय्यक तहसिल कार्यालय, मोखाडा ८२७५५९३०८६

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हा – पालघर
अधिकारी / कर्मचारी ( तहसिलद कार्यालय,पालघर)
अधिकारी/ कर्मचाऱ्याचे नाव पद कार्यालयाचे नाव मोबाईल क्र.
श्री. रमेश शेंडगे तहसिलदार तहसिल कार्यालय, पालघर ९४२३४२९५२२
श्री. मनोज देसले अव्वल कारकुन तहसिल कार्यालय, पालघर  
श्री. अनुप पिंपळे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तहसिल कार्यालय, पालघर ९९७५५५०३०३
श्री. तथागत चौरेकर तांत्रिक सहाय्यक तहसिल कार्यालय, पालघर ९६७३६४२६२७

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हा – पालघर
अधिकारी / कर्मचारी ( तहसिलद कार्यालय,तलासरी)
अधिकारी/ कर्मचाऱ्याचे नाव पद कार्यालयाचे नाव मोबाईल क्र.
श्री. अमोल पाठक तहसिलदार तहसिल कार्यालय, तलासरी ९६८९६८४०३४
श्रीम. प्राची तामोरे अव्वल कारकुन तहसिल कार्यालय, तलासरी ९०२९८६३३५९
श्री. अशोक कडु सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तहसिल कार्यालय, तलासरी ९६७३२१२९३९
श्री. सागर शिंदे तांत्रिक सहाय्यक तहसिल कार्यालय, तलासरी ९४२३६१४६०७

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हा – पालघर
अधिकारी / कर्मचारी ( तहसिलद कार्यालय,वसई)
अधिकारी/ कर्मचाऱ्याचे नाव पद कार्यालयाचे नाव मोबाईल क्र.
श्री. अविनाश कोष्टी तहसिलदार तहसिल कार्यालय, वसई ९८६७६४६७६४
श्रीम. लिना लोधी अव्वल कारकुन तहसिल कार्यालय, वसई ९०११४२६८२८
रिक्त सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तहसिल कार्यालय, वसई
श्री. आकाश आळशी तांत्रिक सहाय्यक तहसिल कार्यालय, वसई ८७७९७३९९३६

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हा – पालघर
अधिकारी / कर्मचारी ( तहसिलद कार्यालय,विक्रमगड)
अधिकारी/ कर्मचाऱ्याचे नाव पद कार्यालयाचे नाव मोबाईल क्र.
श्रीम. चारुशिला पवार तहसिलदार तहसिल कार्यालय, विक्रमगड ९७६५१०८०५६
रिक्त अव्वल कारकुन तहसिल कार्यालय, विक्रमगड
श्री. मुक्ता काकडे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तहसिल कार्यालय, विक्रमगड ९१७२५५८११४
श्री. रोहित पाटिल तांत्रिक सहाय्यक तहसिल कार्यालय, विक्रमगड ७७०९०५६४३३
 श्री. निशांत पाटिल तांत्रिक सहाय्यक तहसिल कार्यालय, विक्रमगड ९६५७२१३९३२
श्री. दर्शन बांगर तांत्रिक सहाय्यक तहसिल कार्यालय, विक्रमगड ९६१९०४६५६९
श्री. दिया माधवी तांत्रिक सहाय्यक तहसिल कार्यालय, विक्रमगड ७७९८१३६६४५

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हा – पालघर
अधिकारी / कर्मचारी ( तहसिलद कार्यालय,वाडा)
अधिकारी/ कर्मचाऱ्याचे नाव पद कार्यालयाचे नाव मोबाईल क्र.
श्री. भाऊसाहेब अंधारे तहसिलदार तहसिल कार्यालय, वाडा ९१६८०६७७७७
रिक्त अव्वल कारकुन तहसिल कार्यालय, वाडा ९८२३७७५६५३
श्री. हेमंत पाटिल सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तहसिल कार्यालय, वाडा ९७६४१९१७४२
राकेश गोळे तांत्रिक सहाय्यक तहसिल कार्यालय, वाडा ९७६६२३२४८७
श्रीम. मानसी पाटिल तांत्रिक सहाय्यक तहसिल कार्यालय, वाडा ८१८०९३६६८५
श्री. चिराग देसले तांत्रिक सहाय्यक तहसिल कार्यालय, वाडा ८२३७६७०४६४

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनामहाराष्ट्र ता.विक्रमगड जि.पालघर

यशोगाथा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनामहासन 2023-24

योजनेचे नांव:- फळबाग लागवड ( केळी लागवड )

लाभार्थ्याचे नांवश्री.नामदेव बाळु गावित, रा.शेवते ( सुकसाळे ) ता.विक्रमगड, जि.पालघर

     संरक्षित शेती केळी उत्पादनातून साधली आर्थिक प्रगती

आंतरपिकातुन मिळवला शेवते, सुकसाळे (जि.पालघर) येथील नामदेव गावित यांनी फायदा

पालघर जिल्हयातील विक्रमगड तालुका हा भात पिकाचे आगार म्हणुन ओळखला जातो. मात्र तालुक्याचा दक्षिण भागामध्ये आता भात या पिकाबरोबर फळबाग व फुलशेती या पिकांचे क्षेत्र वाढत आहे. हा भाग माळरान असल्याने गेल्या चार ते पाच वर्षामध्ये या तालुक्यातील अनेक शेतकरी फळबाग व फुलशेती या पिकाकडे वळले आहेत. आता या शेतकऱ्यांचे फळबाग व फुलशेती हेच मुख्य पीक बनले आहे. अशा शेतकऱ्यांपैकी एक आहेत शेवते, सुकसाळे (ता.विक्रमगड, जि.पालघर) येथील नामदेव गावित. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 4.5 एकर शेती आहे. सन 2012 पासुन शेतीत उतरलेल्या नामदेव गावित यांनी सन 2021 पर्यंत फक्त्‍ पावसाळी भात यांसारखे पारंपारिक पिके घेतले बाकीच्या महिन्यात ते रोजगारासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना या मध्ये काम करण्यासाठी जात होते. सन 2023 मध्ये त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत एक एकर क्षेत्रावर ग्रँड नाइन या जातीच्या केळीची लागवड केली व त्यांना शासन स्तरावरून 106964/- रू. इतकी मंजुरी देण्यात आली आज अखेर त्यांना 38220/- अकुशल व 16291/- रू. रक्कम त्यांना प्रदान करण्यात आली. त्याला सन 2023 मध्ये एक एकर क्षेत्रातुन 20 टन उत्पादन मिळाले. त्याला 10 रूपये प्रति किलो दर मिळाला. मिळालेल्या या यशामुळे केळी पीक आपल्याला जमु शकते, याची खात्री पटली.

KELI

योजनेचे नाव :- फुलशेती (सोनचाफा लागवड).  :

: लाभार्थ्यांचे नाव ::   श्री. सोनी यशवंत माळगावी, रा. झडपोली (अलोंडे) ता. विक्रमगड, जि. पालघर.

*फुलशेतीचा यशस्वी प्रयोग*

सोनचाफ्याचे विक्रमी उत्पादन घेणारे :- श्री. सोनी माळगावी.

 पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका हा भात पिकाचे आगार म्हणून ओळखला जातो. मात्र तालुक्‍याचा दक्षिण भागामध्ये आता भात या पिका बरोबर फळबाग व फुलेशेती या पिकांचे क्षेत्र वाढत आहे. हा भाग माळरान असल्याने गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये या तालुक्‍यातील अनेक शेतकरी फळबाग व फुलशेती या पिकाकडे वळले आहेत. आता या शेतकऱ्यांचे फळबाग व फुलशेती हेच मुख्य पीक बनले आहे. अशा शेतकऱ्यांपैकी एक आहेत झडपोली (अलोंडे, ता. विक्रमगड, जि. पालघर ) येथील सोनी माळगावी. त्यांच्याकडे वडिलोपार्जित ३.५ एकर शेती आहे. सन २०१४ पासून शेतीत उतरलेल्या सोनी माळगावी यांनी  सन २०२३ पर्यंत फक्त पावसाळी भात यांसारखे पारंपरिक पिके घेतले बाकीच्या महिन्यात ते रोजगारासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना या मध्ये काम करण्यासाठी जात होते.सन २०२3 मध्ये त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ०.२५ हे. क्षेत्रावर सोनचाफा  लागवड केली व त्यांना शासन स्तरावून ११५४३० /- रु. इतकी मंजुरी देण्यात आली आज अखेर त्यांना ४९१४०/- रु. अकुशल रक्कम त्यांना प्रदान करण्यात आली. त्याला सन २०२४ मध्ये ०.२५ हे क्षेत्रातून जवळपास ९०० नग  सोनचाफा उत्पन्न मिळाले. त्याला १.५० रुपये प्रति नग दर मिळाला. मिळालेल्या या यशामुळे सोनचाफा लागवड आपल्याला जमू शकते, याची खात्री पटली.

egs

egs

योजनेचे नाव :- फुलशेती (मोगरा लागवड).  :

: लाभार्थ्यांचे नाव ::   श्री. गुरूनाथ सोनू चौधरी, रा. अंधेरी (जांभे) ता. विक्रमगड, जि. पालघर.

*फुलशेतीचा यशस्वी प्रयोग*

फुलशेतीतून अंधेरी, जांभे (जि. पालघर) येथील गुरूनाथ चौधरी यांची आर्थिक प्रगतीकडे वाटचाल

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका हा भात पिकाचे आगार म्हणून ओळखला जातो. मात्र तालुक्‍याचा दक्षिण भागामध्ये आता भात या पिका बरोबर फळबाग व फुलेशेती या पिकांचे क्षेत्र वाढत आहे. हा भाग माळरान असल्याने गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये या तालुक्‍यातील अनेक शेतकरी फळबाग व फुलशेती या पिकाकडे वळले आहेत. आता या शेतकऱ्यांचे फळबाग व फुलशेती हेच मुख्य पीक बनले आहे. अशा शेतकऱ्यांपैकी एक आहेत अंधेरी (जांभे, ता. विक्रमगड, जि. पालघर ) येथील गुरूनाथ चौधरी. त्यांच्याकडे वडिलोपार्जित ८ एकर शेती आहे. सन २०२० पासून शेतीत उतरलेल्या गुरूनाथ चौधरी यांनी  सन २०२३ पर्यंत फक्त पावसाळी भात यांसारखे पारंपरिक पिके घेतले बाकीच्या महिन्यात ते रोजगारासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना या मध्ये काम करण्यासाठी जात होते.सन २०२3 मध्ये त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत एक एकर क्षेत्रावर बेंगलोरी  या जातीच्या मोगरा लागवड केली व त्यांना शासन स्तरावून २७६७५ /- रु. इतकी मंजुरी देण्यात आली आज अखेर त्यांना १२६९३/- रु. अकुशल व  १००००/- रु. रक्कम त्यांना प्रदान करण्यात आली. त्याला सन २०२४ मध्ये एक एकर क्षेत्रातून जवळपास ६ किलो मोगरा उत्पादन मिळाले. त्याला ८०० रुपये प्रति किलो दर मिळाला. मिळालेल्या या यशामुळे मोगरा लागवड आपल्याला जमू शकते, याची खात्री पटली.

egs

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण  रोजगार हमी योजना – महा.

सन २०२२ – २३

योजनेचे नाव :-

फुलशेती (मोगरा लागवड).
:: लाभार्थ्यांचे नाव ::

श्री. नाना काशिनाथ लाहारे, रा. मोऱ्हाडा तालुका – मोखाडा जिल्हा पालघर

*फुलशेतीचा यशस्वी प्रयोग*

फुलशेतीतून मोऱ्हांडा (जि. पालघर) येथील नाना काशिनाथ लाहारे यांची आर्थिक प्रगतीकडे वाटचाल

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका हा दुर्गंम भाम म्हणून ओळखला जातो आगार म्हणून ओळखला जातो. मात्र तालुक्‍याच्या काही  भागामध्ये आता भात या पिका बरोबर फळबाग व फुलेशेती या पिकांचे क्षेत्र वाढत आहे. हा भाग माळरान असल्याने गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये या तालुक्‍यातील अनेक शेतकरी फळबाग व फुलशेती या पिकाकडे वळले आहेत. आता या शेतकऱ्यांचे फळबाग व फुलशेती हेच मुख्य पीक बनले आहे. अशा शेतकऱ्यांपैकी एक आहेत मोऱ्हांडा ( ता. मोखाडा, जि. पालघर ) येथील नाना काशिनाथ लाहारे . त्यांच्याकडे वडिलोपार्जित ४ एकर शेती आहे. शेतीत उतरलेल्या नाना काशिनाथ लाहारे यांनी  सन २२-२०२३ पर्यंत फक्त पावसाळी भात यांसारखे पारंपरिक पिके घेतले बाकीच्या महिन्यात ते रोजगारासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना या मध्ये काम करण्यासाठी जात होते. सन २२-२०२३ मध्ये त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत १० गुंठ्ठे क्षेत्रावर १००० रोपे मोगरा लागवड  केली व त्यांना शासन स्तरावून २६,७४० /- रु. इतकी मंजुरी देण्यात आली आज अखेर त्यांना एकूण १६,१२८ रु. रक्कम त्यांना प्रदान करण्यात आली. त्याला सन २०२४ मध्ये १० गुंठ्ठे क्षेत्रातून जवळपास ८ किलो मोगरा उत्पादन मिळाले. त्याला ८०० रुपये प्रति किलो दर मिळाला. मिळालेल्या या यशामुळे मोगरा लागवड आपल्याला जमू शकते, याची खात्री पटली.

EGS

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र तहसील कार्यालय जव्हार

1.मोगरा लागवड करणे (कृषी विभाग)

देशातील ग्रामीण क्षेत्रामधील  कुटुंबीयांना कमीत कमी 100 दिवसांचा रोजगाराची हमी देण्यासाठी केंद्रशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम  2005 या ‍ नावाने  ‍ वैशिष्टे पूर्ण कायदा लागू केला आहे.

      राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र रोजगार हमी  अधिनियम  1977  नुसार राबविल्या  जाणा-या  योजनेच्या धर्तीवर आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी  अधिनियमात  राज्यात रोजगार हमी योजनेमध्ये अंतर्गत नसलेल्या काही नवीन बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

  1. सर्व इच्छुक कुटुं बांना रोजगार पत्रि का ( जॉबकार्ड ) फोटो सहित लॅमिनेटेड ओळख पत्र देणे
  2. कामाची निवड ,नियोजन व अंमलबजावणी यामध्ये ग्रामपंचायतीचा संपूर्ण सहभाग असणे.
  3. एकुण नियोजनाच्या किमान 50 % कामे ग्रामपंचायतीमार्फत राबविणे.
  4. संपुर्ण पारदर्शकता.
  5. सामाजिक आंकेक्षण करणे.
  6. प्रत्येक कुटुंबियांना वर्षात केवळ 100 दिवसांची रोजगाराची हमी
  1. काम सुरू होण्या आधीची पार्श्वभुमी/ परिस्थिती

     पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यात कोगदा ग्रामपंचायतीतील चंद्रगाव हे गाव आहे .गावची लोकसंख्या  साधारणत: 3500 आहे त्यापैकी १00% लोकसख्या आदीवासी गाव समाजाचे आहेत. गावामध्ये शासना कडून विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात, गावातील 80% लोक शेती हा व्यवसाय करतात. रोजगार हमी योजनेतून गावातील शेकऱ्यांना व मजुरांना विवध प्रकारचे लाभ दिले जातात. सन 2023-24 मध्ये या गावातील शेतकरी श्री. विनायक कृष्णा घेगड या शेतकऱ्याला रोजगार हमी योजनेतून (कृषी विभाग) मोगरा लागवडी साठी अनुदान देण्यात आले.

. कामाचे स्वरुप ( सार्वजनिक व वैय क्ति क लाभाची कामे )

     हे वयक्तिक लाभाचे काम असून कामाचे नाव : मोगरा लागवड करणे आहे.

  1. सार्वजनिक काम असल्यास लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती :- निरंक
  2. कामाचेठिकाण ‍ -(जिल्हा, तालुका व ग्रामपंयायत/ गावाचे नाव)

     जिल्हा – पालघर , तालुका – जव्हार  ग्रामपंचायत- ग्रुप ग्रामपंचायत कोगदा  , गावाचे नाव – चंद्रगाव

  1. काम सुरू झालेला दिनांक :- 05/06/2023
  2. काम पुर्ण झाल्याचे दिनांक : सद्त काम चालु आहे
  3. काम इतर विभागा बरोबर अभिसरणाद्वारे केले आहे का ? असल्यास त्याबाबतची

       माहिती  : निरंक  

  1. कामासाठी आलेला एकुण खर्च

      अकुशल  – 11,000 रु.  /-

      कुशल     – 5000  रु.  /-

      एकुण – 16,000  रु.  /-

9. . कामामुळे झालेली  परिणाम ( रोजगारनिर्मीती , उत्पादन वाढ, दारीद्रनिर्मुलन इत्यादी वर काय  परिणाम झाला ) कामाचे फायदे व कामांमुळे झालेला शश्वत विकास

     अ. आनंत नगर हे जव्हार तालुक्यातील दुर्गम भागातील एक छोटस गाव  आहे . या गावात

     100 %  आदीवासी लोक  आहेत.

     ब.  या गावातील श्री . विनायक कृष्णा घेगड यांनी आपल्या शेतावर कृषी विभागा कडून( रोजगार हमी योजना) मोगऱ्याची लागवड केली.

     क.  मोगरा लागवडीतून हे वार्षिक उत्पन्न दीड लाख ते दोन लाख रुपये इतके घेतात. सण उत्सवाच्या काळात मोगऱ्याची मागणी वाढते तसेच दर ही उंचावतो त्यामुळे शेतकऱ्याचा उत्तम फायदा होतो.

  1. कामासाठी शासकिय अधिका-यांचा समावेश तसेच ग्रामसेवक/ ग्रामरोजगार सेवक यांचा सहभाग कसा होता ?

     कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच तहसील कार्यालयातील रोजगार हमी योजना शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभार्थ्यास मिळाले.

सदर कामाचे/ उपक्रमाचे यश  पाहून दुस-याठिकाणी तो उपक्रम राब विण्यास आला का ?  असल्यास कुठे :-  होय –  गावातील इतर शेतकऱ्यांनी ही या योजनेचा लाभ घेऊन आपल्या जमिनीवर मोगऱ्याची लागवड केली व त्यातून ते आज उत्पन्न घेत आहेत.

  1. कामांसंबधीचीनिवडक छायाचित्र : खालील प्रमाणे

MOGRA

IMAGE

2.सोनचाफा लागवड करणे (कृषी विभाग)

  1. काम सुरू होण्या आधीची पार्श्वभुमी/ परिस्थिती

     पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यात पाथर्डी ग्रामपंचायतीतील वांगणपाडा हा छोटासा पाडा  आहे . पाड्याची लोकसंख्या  साधारणत: 350 आहे त्यापैकी १00% लोकसख्या आदीवासी गाव समाजाचे आहेत. गावामध्ये शासना कडून विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात, लोक शेती हा व्यवसाय करतात. रोजगार हमी योजनेतून गावातील शेकऱ्यांना व मजुरांना विवध प्रकारचे लाभ दिले जातात. सन 20232024 मध्ये या गावातील शेतकरी श्री. लहानु मावंजी महाले या शेतकऱ्याला रोजगार हमी योजनेतून (कृषी विभाग) सोनचाफा लागवडी साठी अनुदान देण्यात आले. सध्या ते शेती मधून चांगले उत्पन्न घेत आहेत.त्यांची 3000 सोनचाफा ,100 आंबे आणि 300 काजूची वाडी आहे.

कामाचे स्वरुप ( सार्वजनिक व वैय क्ति क लाभाची कामे )

      हे वयक्तिक लाभाचे काम असून कामाचे नाव : सोनचाफा लागवड करणे आहे.

  1. सार्वजनिक काम असल्यास लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती :- निरंक
  2. कामाचेठिकाण ‍- (जिल्हा, तालुका व ग्रामपंयायत/ गावाचे नाव)

      जिल्हा – पालघर , तालुका – जव्हार  ग्रामपंचायत- ग्रुप ग्रामपंचायत पाथर्डी  , गावाचे नाव – वांगणपाडा

  1. काम सुरू झालेला दिनांक :- 08/08/2023
  2. काम पुर्ण झाल्याचे दिनांक :- सद्त काम चालु आहे
  3. काम इतर विभागा बरोबर अभिसरणाद्वारे केले आहे का? असल्यास त्याबाबतची

       माहिती  : निरंक  

  1. कामासाठी आलेला एकुण खर्च

      अकुशल    – 5733   रु.  /-

      कुशल – 5900   रु.  /-

      एकुण – 11,600  रु.  /-

कामामुळे झालेली  परिणाम ( रोजगारनिर्मीती , उत्पादन वाढ, दारीद्रनिर्मुलन इत्यादी वर काय  परिणाम झाला ) कामाचे फायदे व कामांमुळे झालेला शश्वत विकास

      श्री . लहानु महाले यांनी आपली वाडी खूप परिश्रम करून उभी केली आहे सध्या ते सोनचाफा मधून वार्षिक उत्पन्न 2 ते 3लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न घेतात. तसेच ते काजू आणि आंबा यातून 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न घेतात. ते आज त्यांच्या गावातील शेतकऱ्यांसाठी आदर्श बनले आहेत.

10. कामासाठी शासकिय अधिका-यांचा समावेश तसेच ग्रामसेवक/ ग्रामरोजगार सेवक यांचा सहभाग कसा होता ?

      कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच तहसील कार्यालयातील रोजगार हमी योजना शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभार्थ्यास मिळाले.

  1. सदर कामाचे/ उपक्रमाचे यश पाहून दुस-याठिकाणी तो उपक्रम राब विण्यास आला का ? असल्यास कुठे :- होय – गावातील इतर शेतकऱ्यांनी ही या योजनेचा लाभ घेऊन आपल्या जमिनीवर सोनचाफा , मोगरा लागवड व आंबा- काजू केली व त्यातून ते आज उत्पन्न घेत आहेत.
  2. कामांसंबधीचीनिवडक छायाचित्र : खालील प्रमाणे

IMAGE

                                     यशोगाथा

  • शेतकरी नाव :- श्रीम. सावित्री मदन वायडा करळगाव ,ता. पालघर , जि. पालघर
  • भ्रमणध्वनी क्रमांक  :- ७६२०५३१७०६
  • कामाचे नाव  :- म.ग्रा.रोहयो अंतर्गत फूलशेती (गुलाब) लागवड सन २०२१- २२      
  • क्षेत्र :- ०.६० हे.
  • शेतकरी यांना झालेला फायदा :- दर दिवसाला सध्या ९ ते १० किलो फुले मिळतात त्याची विक्री जागेवरून 200 रुपये किलो या दराने होते. त्यांना या विक्रीतुन दररोज १८०० ते २ हजार उत्पन्न मिळते.
  • शेतकरी यांचे अभिप्राय :-  सन-२०२१-२०२२ म.ग्रा.रोहयो योजने अंतर्गत गुलाब लागवड केली असून यामुळे भाहेर काम शोधण्या पेक्षा आम्हाला आमच्या शेतामध्ये काम उपलब्ध झाले. फूलांच्या विक्रीतुन आम्हाला आर्थिक फायदा होत आहे. व आमच्या बरोबर गावातील दोन मजुरांना यामुळे काम मिळाले. कृषि विभागाच्या योग्य मार्गदर्शन नुसार योजनेचा लाभ घेतल्यास कुटुंबाचा विकास साधता येतो.

कृषि विभाग कर्मचारी अभिप्राय :- श्रीम. सावित्री वायडा यांनी या योजनेचा योग्य प्रकारे लाभ घेतलेला आहे. त्यांची व त्यांच्या कुटुंबातील ईतर सदस्य यांच्या चिकाटीने त्यांची रोजगारासाठी होणारी भटकंती थांबली व गावातील दोन मजुरांना त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध झाला.

                               लाभार्थी :- श्रीम सावित्री मदन वायडा

palghar

IMAGE

palghar

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र

अंतर्गत शेततळे यशोगाथा

गावाचे नावसाखरशेत

ग्रामपंचायत उज्जैनी

ता.वाडा जि.पालघर

                                               शेततळे

शेतक-याचे नाव – श्री. संजय गुणा लहांगे

     गाव- साखरशेत (उज्जैनी) ता.वाडा .जि.पालघर

     कामाचा संकेतांक  :-  1802008/IF/1235947623

     मनुष्य दिवस निर्मीती :- 834

     आकारमान :- 25 X 25 X 3  मीटर

     तांत्रिक मान्यता :-  1744  दि.05/12/2023

     प्रशासकीय मान्यता:- 44-3/23-24  दि. 04/01/2024

     अंदाजपत्रकीय रक्कम :-  अकुशल  – 322656/-

                      कुशल     – 112223/-                

                                  एकुण      – 434879/-

     ग्रामरोजगार सहाय्यक :-  श्री.भरत लहांगे

     कार्यन्वीत यंत्रणा :-  तालुका कृषी अधिकारी वाडा

उदिष्ट्ये :-

          महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र अंतर्गत शेततळे या कामांमुळे शेतक-याच्या  शाश्वत उत्पन्नात वाढ होऊन  त्याच्या कुटूंबाचे जिवनमान उंचावणे अपेक्षित आहे.

काम सुरू होण्या आधीची पार्श्वभुमी/ परिस्थिती

2 फेब्रुवारी 2006 पासुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- कार्यान्वीत करण्यात आलेली आहे योजनेचा ग्रामीण भागात व्यापक प्रसार व्हावा व मजुरांना जास्तीत जास्त लाभ मिळावा हा प्रमुख उद्देश आहे. पालघर जिल्हयातील वाडा तालुक्यातील साखरशेत गावामध्ये हृया योजनेचे कामे घेण्यास सुरूवात झाली.उज्जैनी  हे गाव वाडा तालुक्यापासुन साधारणत: 25कि.मी. अंतरावर  असलेले आदिवासी बहूल गाव आहे. या गावातील मुख्यपिक भात असून खरीप हंगामात घेतले जाते.त्यानंतर पाण्याची उपलब्धता नसल्याने  कुठलेही पिक घेतले जात नाही.

अंमलबजावणी प्रक्रिया :-

सदर शेत-यांचे नाव सन 2023-24 या वित्तीय वर्षात मंजुर आहे. त्यानुसार सदर कामाचे दस्ताऐवज तालुका कृषी अधिकारी वाडा या कार्यालय मार्फत मगांराग्रारोहयो कक्षेत सादर करण्यात आले.सदर दस्ताऐवजची पाहणी व पडताळणी करुन शासकिय नियमाचे अटी व शर्तीनुसार काम सुरू करण्यात आले.“ मागेल त्याला काम” तसेच” पाहिजे त्याला काम” व “कामाप्रमाणे दाम” या नरेगाच्या ब्रिद वाक्यानुसार गावातील शेतक-याला व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि मजुरांना काम देण्यात आले.

कामामुळे घडुन आलेला बदल :-

श्री.संजय गुण्या लहांगे हे यांचे कुटूंब यापूर्वी खरीप हंगामामध्ये भात पिक घेतल्यानंतर पाण्याचा स्त्रोत नसल्याने नंतर कुठल्याही प्रकारचे पीक घेत नव्हते.परंतु आता त्यांना प्लास्टिक अस्तरीकरणासह शेततळेचा लाभ मिळाल्याने त्याच्याकडे जानेवारी  अखेर शेततळयामध्ये साधारणत: 8 फुट खोल एकढे पाणी आहे.यावर्षी त्यांनी शेततळयात रोहू,कटला व तिलापिया या प्रकारचे मत्सबिज तलावात टाकले आहे.त्यापासुन त्यांना चांगले उत्पन्न अपेक्षित आहे.तसेच पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे सदर शेतकरी हे पुढील हंगामात मोगरा लागवड करण्यास इच्छुक आहेत.अशाप्रकारे सदर शेतक-याची शाश्वत उत्पन्न्‍ मिळविण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.

प्रकल्पाची संकल्पना कशी सुचली :-

कृषी व रोहयो विभागाचे अधिकारी  रोजगार सहाय्यक मार्फत भेटले.त्यांनी शेततळे खोदुन त्यास प्लास्टीक अस्तीरीकरण केल्यास पाणी साठा चांगला राहतो व या प्रकारचे प्लास्टीक अस्तीरीकरणासह शेततळे मगांराग्रारोहयो  विभागातुन 100% अनुदानातुन होते.याबाबत माहिती दिली व शेततळे खोदुन घेण्यास सुचविले.

लाभार्थ्याचे योजनेबाबत मनोगत :-

यापूर्वी आम्ही पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असलेले भात पिक घेतल्यानंतर जमिनीतुन कुठल्याही प्रकारचे पिक घेता येत नव्हते.परंतु सदर शेततळे चा लाभ मिळाल्यामुळे मी सदर शेततळयामध्ये मासे उत्पादन घेत आहे.तसेच उपलब्ध पाण्यावर पुढील हंगामात शेतामध्ये इतर पिक घेण्याचा विचार करत आहे.याप्रकारे सर्व शेतक-यांनी सदर योजनेचा लाभ घेतल्यास एक शाश्वत उत्पन्न घेता येईल असे मला वाटते.

IMAGE